कीर्तनकार Engineer ते PSI ! नाशिकच्या महिला कीर्तनकार झाल्या ‘PSI’, इंदुरीकर महाराजांकडे अध्यात्मिक…

कीर्तनकार Engineer ते PSI ! नाशिकच्या महिला कीर्तनकार झाल्या ‘PSI’, इंदुरीकर महाराजांकडे अध्यात्मिक…

सातवी पासूनच बाल कीर्तनकार अशी ज्यांची ओळख आहे त्या म्हणजे रूपाली केदार. अध्यात्माच्या शिक्षणासोबतच रुपालीने अभियांत्रिकी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. रूपाली सिन्नर तालुक्याच्या तोडीची असून त्यांचे कुटुंब वारकरी आहे.

रूपाली यांचे काका मनोहर केदार हे नोकरीसाठी आळंदीला होते. त्यामुळे आई वडिलांच्या इच्छेनुसार रुपालीने चौथीपासून आळंदीत अध्यात्म शिक्षणासोबत शाळा सुरू ठेवली. पुढे सुप्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याकडे ओझरला काही काळ अध्यात्माचे धडे देखील रूपाली यांनी गिरविले.

यानंतर त्यांनी राजाराम आव्हाड महाराजांचे मार्गदर्शन देखील घेतले.या जोरावर रुपालीने इयत्ता सातवी पासूनच बालकिर्तनकार ही ओळख निर्माण केली आहे. अध्यात्माच्या शिक्षणासोबतच रुपालीने अभियांत्रिकीचे शिक्षण देखील पूर्ण केले. रूपाली यांचे स्वप्न होते ते एमपीएससीची तयारी करणे. कुठलेही यश सहजासहजी मिळत नसते याचा अनुभव देखील रूपाली यांनी घेतला आहे.

त्यांनी 2018 मध्ये एमपीएससी ची पहिली पूर्व परीक्षा दिली या परीक्षेत त्या नापास झाल्या. मात्र खचून न जाता आपले प्रयत्न सुरूच ठेवण्याचा निश्चय रुपाली यांनी केला. रुपाली चे काका संतोष केदार हे मुंबई पोलिसांमध्ये आहेत. तिने त्यांचे मार्गदर्शन घेत पुढे या परीक्षेत पास होण्याचा निश्चय केला. यानंतर त्यांनी खाजगी शिकवण्या देखील लावल्या.

एवढे सर्व करत असताना दुसरीकडे कीर्तन देखील सुरू ठेवले.रूपाली यांची एमपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरू असतानाच लग्न झाले. 2017 मध्ये नितीन सानप यांच्याशी त्यांचा विवाह झाला. घर, कीर्तन आणि अभ्यास या सर्वांची सांगड घालत आज रूपाली यशस्वीपणे एम पी एस सी परीक्षा पास झाल्या आहेत.

ही परीक्षा देत असताना पती नितीन यांनीही त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला. त्या जोरावरच 2019 मध्ये झालेल्या पूर्व आणि नंतर मुख्य परीक्षेत बाजी मारली आहे. रूपालीच्या मुलाखतीमध्ये कीर्तनाचा उपयोग झाला असुन तिच्या रसाळ ,मधुर वाणीने असंख्य भक्तांना वेड लावले आहे. हाच सभाधीटपणा तिला मुलाखतीमध्ये कामी आला आहे.

रूपालीने न भिता मुलाखत दिली आणि म्हणून त्यांची निवड झाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असलेली एमपीएससी परीक्षा पास होणे तसे कठीणच आहे. नाशिकचा रूपाली केदार यांनी मिळवले एमपीएससी परीक्षेत यश विज्ञानाचा आणि अध्यात्म यांचा सुवर्णमध्य साधून सुरु केलेला हा प्रवास यशस्वीरित्या रूपाली केदार यांनी पार पाडला आहे.

अखेर त्या आता एमपीएससी परीक्षेत पास झाल्या आहेत. कीर्तनकार रूपाली केदार या आता पीएसआय झाल्या आहेत. रूपाली यांची पीएसआय पदी निवड झाली आहे.

Aniket Ghate