प्रियंका चोप्राच्या ह्या एका मोठ्या चुकीचा होत आहे आता तिला पश्चात्ताप!!!

प्रियंका चोप्राच्या ह्या एका मोठ्या चुकीचा होत आहे आता तिला पश्चात्ताप!!!

प्रियंका चोप्रा केवळ बॉलिवूडची सुपरस्टारच नाही तर ती हॉलिवूडमध्येही खूप प्रसिद्ध झाली आहे. प्रियांकाने तिच्या कारकीर्दीत बर्‍याच फेयरनेस क्रिम च्या जाहिराती केल्या आहेत. पण आता तिला या जाहिराती केल्याबद्दल पश्र्चाताप होत आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियंका म्हणाली की या जाहिराती करून तिला बर्‍याच लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. जो तीच्यासाठी खूप वाईट टप्पा होता. असे म्हटले जात आहे की प्रियांकाने हॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केल्यापासून तिने अशा जाहिरातींमध्ये भाग घेणे बंद केले आहे.

असे चर्चेत आहे की प्रियांकाचं पुस्तक लवकरच लाँच होणार आहे. ज्याचे नाव ‘अन्फिनीशड’ म्हणजेच ‘अपूर्ण’ असे आहे . यात तीने बर्‍याच गोष्टींबद्दल खुलेपणाने भाष्य केले आहे. प्रियंकाने पुस्तकात लिहिले आहे की, दक्षिण आशियामध्ये स्किन लाइटनिंग क्रीम विकणे फार सामान्य आहे.

कारण हा उद्योग खूप मोठा आहे, प्रत्येकजण येथे अशी भर घालत आहे. मी जेव्हा लहान होते तेव्हा मला असा समज असायचा की, गडद त्वचा असणे चांगली गोष्ट नाही. पण हे चुकीचे आहे. मीसुद्धा त्यात काम करून चूक केली आहे.ती म्हणाली की, माझे सर्व भाऊ व बहिणी गोरे आहेत.

मी सावळी होते, म्हणून घरातले प्रत्येकजण मला काळी-काळी म्हणून चिडवायचे. मग वयाच्या 13 व्या वर्षी मला फेअरनेस क्रीम लावायची होती आणि माझे न्यूनगंड दूर करायचे होते. पण आता मला समजले आहे. आणि म्हणूनच मी हे सर्व थांबविले.

प्रियंकाचं ‘अन्फिनीशड’ हे 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या पुस्तकात प्रियंकाने तिचे बालपण, मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड होण्याचा तिचा प्रवास, अमेरिकेत घडलेला रंगभेद आणि ती बॉलिवूडपासून हॉलिवूड जगात कशी पोहचली याची माहिती दिली आहे.

Aniket Ghate