प्रियांका चोप्राला आई होण्यासाठी निकची ही मागणी पूर्ण करावी लागेल!!!

प्रियांका चोप्राला आई होण्यासाठी निकची ही मागणी पूर्ण करावी लागेल!!!

एकेकाळी बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली प्रियांका चोप्रा आता एक ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जात आहे. प्रियांकाच्या लग्नाला आता दोन वर्ष पूर्ण झाली असून अनुष्का शर्मा आणि करिनाच्या पाठोपाठ प्रियांका सुद्धा फॅमिली प्लानिंगच्या तयारीला लागली आहे अशी चर्चा आहे.

एवढंच नाही तर प्रियांकाचा पती आणि सिंगर निक जोनस देखील नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबाबत दिलखुलासपणे बोलला.प्रियांका आणि निक २०१८ मध्ये उमेद भवन येथे लग्नाच्या बेडीत अडकले होते. प्रियांकाला तिच्या घराकडून सासरी घेऊन जावं अशी निकची इच्छा होती त्यामुळे हे लग्न भारतात करण्यात आल्याचं प्रियांकानं एका मुलाखतीत सांगितलं होतं

याशिवाय तिला एका मुलाखतीत, ‘भविष्यात तुला किती मुलं हवीत?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावर प्रियांकानंही, ‘मला आणि निकला एक-दोन नाही तर खूप सारी मुलं हवी आहेत.’ असं उत्तर दिलं होतं.

निकनं नुकतीच ई-ऑनलाइन डॉट कॉमला मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यानं फॅमिली प्लानिंगबाबतही सांगितलं. निक म्हणाला, प्रियांका माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि मला वाटतं की माझी आणि प्रियांकाची खूप सारी मुलं असावी.

निक जोनसला या मुलाखतीत त्यांच्या होणाऱ्या मुलांबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना निक म्हणाला, ‘हा माझ्या आयुष्यात एक सुंदर प्रवास असणार आहे आणि मला खूप सारी मुलं हवी आहेत.’

निक पुढे म्हणाला, प्रियांका माझ्या आयुष्यातली सर्वात प्रिय व्यक्ती आहे आणि ती अशी व्यक्ती आहे जिचं मी नेहमीच स्वप्न पाहिलं होतं. मला नेहमीच तिच्यासारखी व्यक्ती माझी लाइफ पार्टनर म्हणून हवी होती आणि आता ती माझ्या आयुष्यात असल्यामुळे मी स्वतःला खूपच नशीबवान समजतो.

Aniket Ghate