धक्कादायक ! या कारणास्तव ‘प्राजक्ता माळी’ ने घेतला हास्यजत्रा मधून ब्रेक, समोर आले मोठे कारण

धक्कादायक ! या कारणास्तव ‘प्राजक्ता माळी’ ने घेतला हास्यजत्रा मधून ब्रेक, समोर आले मोठे कारण

प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये आपल्याला दिसत असते. प्राजक्ता माळी हिने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन देखील केले. मात्र तिचे वैयक्तिक आयुष्य देखील वादग्रस्त राहीलेले आहे. प्राजक्ता माळीने काही दिवसांपूर्वीच लग्न आणि लग्न संस्था याबद्दल आपले मत व्यक्त केले होते. प्राजक्ता माळी हिने या पोस्टमध्ये म्हटले होते की, लग्न करावे तर प्रेमविवाह करूनच करावे. नाहीतर लग्न करू नये.

कुठल्याही लग्न संस्थेचा आहारी जाऊ नये, असे तिने म्हटले होते. आता प्राजक्ता माळी हिनेदेखील महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडल्याची माहिती येत आहे. याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. प्राजक्ता माळी हिने काही वर्षांपूर्वी ‘जुळून येती रेशिम गाठी’ ही मालिका केली होती. त्या आधी देखील तिने अनेक मालिका आणि नाटकांमध्ये देखील काम केले.

मात्र, जुळून येती रेशीम गाठी या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. प्राजक्ता माळी हिने या मालिकेमध्ये ललित प्रभाकर याच्यासोबत तिने काम केले होते. ही मालिका देखील लोकप्रिय ठरली होती. त्याचप्रमाणे नुकताच आलेल्या पावनखिंड या चित्रपटातही प्राजक्ता माळी हिने छोटी भूमिका केली आहे.

प्राजक्ता माळी हिने काही दिवसांपूर्वी केलेल्या पोस्ट मुळे ती चर्चेत आली होती. या पोस्टमध्ये तिने म्हटले होते की, एकदा लग्न संस्थेतून मी विवाह करून पाहिला आहे. त्यामुळे आता प्रेम करूनच मी विवाह करणार आहे. आणि माझा हा प्रत्येकासाठी सल्ला आहे. तिच्या या सल्ल्यावर अनेकांनी टीका देखील केली होती.

प्राजक्ता माळी हिचे पहिले लग्न झाले असून घटस्फोट देखील झाला आहे. त्यामुळे आता मी यापुढे प्रेम करूनच लग्न करेल असे तिने म्हटले आहे. प्राजक्ता माळी ही सध्या तिच्या आईसोबत दुबई टूरवर गेलेली आहे. याचे कारण सांगताना तिने म्हटले आहे की, ही माझ्या आईला महिला दिनाची भेट आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून कोरोना महामारीने कुठेही जाता येत नव्हते.

त्यामुळे आता मी आईला दुबई टूरवर नेले आहे. ती आणि मी मस्त मज्जा करत आहे, असेही तिने सांगितले आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोतून तिने काही दिवसासाठी ब्रेक घेतलेला आहे. तिने मालिका सोडली नाही. ही केवळ अफवा असल्याचे देखील सांगण्यात येते. त्यामुळे ती आता दुबई टूर झाल्यानंतर लवकरच भारतात परतणार आहे आणि पुन्हा कामाला लागणार आहे.

दुबई टूरचे तिने अनेक आईसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तर आपल्याला प्राजक्ता माळी आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Aniket Ghate