बाबो, हे काय ? प्राजक्ता माळीने ब्लाऊज न घालताच नेसली साडी, पाहून नेटकरी म्हणाले…

बाबो, हे काय ? प्राजक्ता माळीने ब्लाऊज न घालताच नेसली साडी, पाहून नेटकरी म्हणाले…

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही आपल्या वेगळ्या लूकसाठी ओळखल्या जाते. सोशल मीडियावर देखील ती खूप सक्रिय असते. आपले वेस्टर्न लूकमधील फोटो देखील ती शेअर करत असते. मात्र, पारंपरिक वेशभुषेत तिला फोटोमध्ये पाहायला चाहत्यांना आवडते. तिने साडीमध्ये शेअर केलेले फोटो चहात्यांना प्रचंड आवडतात.

प्राजक्ता माळी हिने काही वर्षांपूर्वी जुळून येती रेशीमगाठी या या मालिकेतून पदार्पण केले होते. या मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त अशी भूमिका केली होती. या मालिकेतील अभिनेता ललित प्रभाकर हा देखील दिसला होता. या मालिकेनंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. या मालिकेमध्ये तिच्या अभिनयाची प्रचंड चर्चा झाली होती. आता सध्या ती हास्य जत्रा कॉमेडी शोचे सूत्रसंचालन करत असते.

या शोमध्ये तिचे खुमासदार सूत्रसंचालन सगळ्यांना खूप आवडते. या कार्यक्रमादरम्यान ती एकदा परफॉर्मन्स सुरू असताना सतत वा दादा वा असे म्हणत होती. तिच्या या वाक्यामुळे देखील तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. त्यामुळे आता असे वाक्य पुन्हा बोलताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्याचा विषय काढला आणि सर्वत्र त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या वादामध्ये प्राजक्ता माळीने उडी घेतली होती.

प्राजक्ता माळी हिने राज ठाकरे यांच्या भोंगा विषयाला समर्थन देऊन याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर तिला देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. काही वेळातच मग प्राजक्ता माळी हिने आपले ते टि्वट डिलीट करून टाकले. त्यानंतर हा वाद शांत झाला. त्याचबरोबर काही महिन्यापूर्वी प्राजक्ताने विवाह संस्थेबाबत देखील आपले मत व्यक्त केले होते.

आता पुन्हा एकदा प्राजक्ता माळी ही ट्रोल झाली आहे. याचे कारण म्हणजे तिने एक साडी नेसलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ब्लाउज विनाच ती दिसत आहे. तिने साडी घातली आहे. त्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. तसेच काही जणांनी तिच्यावर टीका देखील केली आहे, तर काही जणांनी तिचे कौतुक देखील केले आहे.

साडी नेसताना ब्लाउज परिधान न करणं ही कसली फॅशन असा प्रश्न एका चाहत्याने विचारला आहे. तर काही जणांनी तू खूप गोड दिसत आहेस असे म्हटले आहे, तर काही जणांनी तिच्यावर टीका केली आहे. या फोटोत प्राजक्ता माळी ही असामी सिल्क साडीमध्ये दिसत आहे. तसेच साडी वर लाल आणि निळा रंगाचा वर्क देखील पाहायला मिळत आहे. तिने घातलेले दागिने देखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

Aniket Ghate