ऐकलंत का?? लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा प्रभाससोबत करणार चित्रपटात काम!!!

ऐकलंत का?? लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा प्रभाससोबत करणार चित्रपटात काम!!!

काही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी चर्चेत आहे. तिने तिचा मित्र प्रेम मोदीसोबत शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चा रंगल्या होत्या. पण आता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनव बेर्डे चर्चेत आहे.

या चर्चा अभिनवने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे सुरु झाल्या आहेत.अभिनवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता.त्याने स्वत:चा फोटो शेअर करत ‘आरंभ’ असे कॅप्शन दिले आहे.

या कॅप्शननंतर सोशल मीडियावर तो ‘आदिपुरुष’ या चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
दिग्दर्शक ओम राऊत ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाच्या यशानंतर आता ‘आदिपुरुष’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करताना त्यांनी आदिपुरुष चित्रपटाचे पोस्टर आणि ‘आरंभ’ असे म्हटले होते.अभिनवने देखील स्वत:चा फोटो शेअर करत ‘आरंभ’ असे कॅप्शन दिल्यामुळे सोशल मीडियावर तो ‘आदिपुरुष’ या चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास, अभिनेता सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 3D ऍक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत.

२०२२ मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता अभिनव देखील या चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

एका चाहत्याने अभिनवच्या या पोस्टवर आदिपुरुष का? अशी कमेंट केली होती. त्यावर अभिनवने मी आधी पासूनच पुरुष आहे असे मजेशीर अंदाजात म्हटले आहे.

एका चाहत्याने अभिनवच्या या पोस्टवर आदिपुरुष का? अशी कमेंट केली होती. त्यावर अभिनवने मी आधी पासूनच पुरुष आहे असे मजेशीर अंदाजात म्हटले आहे.

अभिनवने अद्याप तो आदिपुरुष चित्रपटात दिसणार की नाही हे सांगितलेले नाही.अभिनवने अद्याप तो आदिपुरुष चित्रपटात दिसणार की नाही हे सांगितलेले नाही.अभिनवने ‘ती सध्या काय करते’, ‘रंपाट’ या चित्रपटांमध्ये काम केले आहेत.

Aniket Ghate