बाबो,पांड्या बंधूंनी घेतले 8 BHK घर,त्याची किंमत ऐकून हवाच टाईट होतीये!!!

बाबो,पांड्या बंधूंनी घेतले 8 BHK घर,त्याची किंमत ऐकून हवाच टाईट होतीये!!!

हार्दिक आणि कृणाल हे पांड्या बंधू त्यांच्या आलिशान राहणीमानाविषयी कायमच चर्चेत असतात. भारताकडून आणि आयपीएलमध्ये खेळून दोघंही बक्कळ पैसे कमवत आहेत. या दोघांनी आता मुंबईमध्ये आलिशान 8 BHK घर घेतल्याचं वृत्त आहे. 3,838 स्क्वेअर फुटाचं हे घर आहे.

तसंच टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी पांड्या बंधूंचे शेजारी आहेत.पांड्या बंधूंनी रुस्तमजी पॅरामाऊंटमध्ये घेतलेल्या या घराची किंमत तब्बल 30 कोटी रुपये आहे. हार्दिक आणि कृणालच्या घरामध्ये जिम, गेमिंग झोन, स्विमिंग पूल, तसंच त्यांच्या अपार्टमेंटमध्ये वैयक्तिक थिएटरही आहे.

हार्दिक आणि कृणाल नुकत्याच झालेल्या श्रीलंका सीरिजमध्ये खेळले. 2 वनडेमध्ये कृणालला एकच विकेट घेता आली, तसंच त्याने 35 रनही केले. तर हार्दिकने सीरिजच्या तिन्ही वनडे खेळल्या, पण त्याला 9.50 च्या सरासरीने बॅटिंग करता आली आणि 2 विकेट मिळाल्या.

कृणाल पांड्याला पहिल्या टी-20 नंतर कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला उरलेल्या 2 टी-20 खेळता आल्या नाहीत.हार्दिक पांड्या 8 खेळाडूंसह कृणालच्या संपर्कात आला, त्यामुळे त्यालाही टी-20 सीरिजच्या उरलेल्या 2 मॅचमध्ये सहभागी होता आलं नाही. कोरोनातून बरा झाल्यानंतर कृणाल तसंच हार्दिक आयपीएलसाठी तयारी करतील.

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार आहे. तसंच आयपीएलनंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कपही होणार आहे. त्यामुळे या दोघांचं लवकरात लवकर फॉर्ममध्ये येणं मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

Team Hou De Viral