या अभिनेत्रीने राहत्या घरी घेतला गळफास

या अभिनेत्रीने राहत्या घरी घेतला गळफास

प्रत्युषा बॅनर्जी हिने पाच वर्षांपूर्वी आपले जीवन संपवले होते. तिच्या आत्महत्येचे कारण अजूनही कळले नाही. तिने आपले जीवन का संपले याबाबत काहीही माहिती मिळाली नाही. बालिका वधूचा दुसरा भाग आल्यानंतरही ती एकदा चर्चेत आली आहे.

तिचे कुटुंबीय देखील पुन्हा समोर आले आहे. तिचे कुटुंबीय आता सध्या हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असल्याचे कळत आहे. आता देखील एका बंगाली अभिनेत्रीने आपले जीवन संपवले आहे. वयाच्या विसाव्या वर्षी तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे चमकत्या दुनियामध्ये जीवन किती अस्ताव्यस्त असते हे आपल्याला लक्षात येते.

बंगाली सिनेसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. बंगाली प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी डे हिने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पल्लवीने वयाच्या विसाव्या वर्षीच स्वतःचे आयुष्य संपुष्टात आणले आहे. या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पल्लवीच्या आत्महत्येचे कारण अजून समोर आले नाही.

रविवारी म्हणजेच १५ मे २०२२ रोजी सकाळी पल्लवीचा मृतदेह घराच्या छताला असलेल्या पंख्याला लटकलेला आढळून आला आहे. सध्या पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. पल्लवीचा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी देण्यात आलेला आहे. पल्लवीचा मृतदेह पंख्याला लटकलेला पाहून तिला कुटुंबीयांनी रुग्णालयात नेले.

पण डॉक्टरांनी लगेच तिला तपासून मृत घोषित केले. या संपूर्ण प्रकरणाचा कोलकत्ता पोलीस तपास घेत आहेत. पल्लवीच्या मृत्यूमुळे बंगाली सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.पल्लवीची सहकलाकार अनामित्रा म्हणाली, मला काहीच कळत नाही आहे पल्लवी आणि मी १२ मे ला एकत्र शूटिंग देखील केलं होतं.

आमच्यात बोलणे देखील झालं होतं. त्यामुळे माझा या बातमीवर विश्वास होत नाही की पल्लवीने आत्महत्या केली असावी असे मला अजूनही वाटत नाही. पल्लवीने छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात मुख्य भूमिकेत काम केले होते. पल्लवी बंगाली टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पल्लवीला “रेशम झंपी “या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली होती.

यानंतर तिने “अमी सिराजर बेगम “या मालिकेत देखील काम केले आहे. पल्लवी पंख्याला लटकलेला अवस्थेत असताना कुटुंबातील सदस्यांनी ते पाहिले आणि तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रुग्णालयाने देखील तिला मृत घोषित केलं आहे.

Sayali Ghate