Nora Fatehi was slapped hard by her co star This is how the fight ended after a scuffle

Nora Fatehi was slapped hard by her co star This is how the fight ended after a scuffle

मुंबई : ‘दिलबर’, ‘कुसू कुसू’, ‘गर्मी’, ‘साकी साकी’ या गाण्यांवर भन्नाट डान्स करून चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री नोरा फतेही (nora fatehi ) बॉलिवूडमधील अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे. एकापेक्षा एक गाण्यावर भन्नाट डान्स (nora fatehi dance) करणाऱ्याच्या तालावर चाहतेही थिरकतात. नोरा फक्त डान्स नाही तर, फोटोंमुळे देखील चर्चेत असते.

 द कपिल शर्मा शोमध्ये नोरा फतेही, आयुष्मान खुराना आणि जयदीप अहलावत यांच्यासह ‘अॅक्शन हिरो’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. याठिकाणी कलाकारांनी अनेक विषयांवर चर्चा केली आणि यादरम्यान ‘अॅक्शन’ची चर्चा सुरू असताना हे प्रकरण सेटवरील भांडणांपर्यंत पोहोचलं.

शोचा होस्ट कपिल शर्माने सर्व कलाकारांना विचारलं की, सेटवर त्यांचं कलाकारांशी भांडण झालं की आणखी कोणाशी? यावर नोरानेही तिचा एक अनुभव सर्वांसोबत शेअर केला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नोराने सांगितलं की तिच्या एका सहकलाकाराने तिला कानशीलात लगावली आणि नंतर हे प्रकरण मारहाणीपर्यंत पोहचलं, भांडण खूप वाईट रीतीने संपलं.  

नोरा फतेहीला तिच्या सहकलाकाराने लगावली कानशीलात
सेटवरील भांडणाबद्दल विचारलं असता, नोराने सांगितलं की, जेव्हा ती तिच्या पहिल्या चित्रपटाचं शूटिंग करत होती, तेव्हा तिची खूप वाईट वेळ होती आणि तिच्या सहकलाकाराचं तिच्याशी भांडण झालं होतं. नोराने सांगितलं की तिच्या सहकलाकाराने तिच्यासोबत गैरवर्तन केलं, ज्यावर नोराने अभिनेत्याला थप्पड मारली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हे करताना अभिनेत्याने उत्तर दिलं आणि नोराला थप्पड मारली.

नोराने हे सांगताच सर्वजण थक्क झाले. किस्सा पुढे चालू ठेवत, नोरा म्हणाली की, जेव्हा तिला अभिनेत्याने थप्पड मारली तेव्हा तिने पुन्हा अभिनेत्यालाही थप्पड मारली. अभिनेता पुन्हा थांबला नाही, त्याने पुन्हा नोराला थप्पड मारलं आणि त्यानंतर दोन्ही कलाकारांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. नोरा आणि त्या अभिनेत्याने एकमेकांचे केस ओढण्यास सुरुवात केली. ते सोडवण्यासाठी आणि दोघांनाही शांत करण्यासाठी मग दिग्दर्शकाला मधे उडी घ्यावी लागली. नोराने सांगितले की ती बांगलादेशमध्ये शूटिंग करत असताना हा संपूर्ण प्रकार घडला.

Aniket Ghate