नवरात्रीच्या या दिवसांत चुकुनही या गोष्टी करू नका, नाहीतर दुर्गा माता रागवेल

नवरात्रीच्या या दिवसांत चुकुनही या गोष्टी करू नका, नाहीतर दुर्गा माता रागवेल

शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातला प्रमुख असा एक सण आहे. हा महोत्सव 17 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या पवित्र उत्सवात मां दुर्गाच्या नऊ रुपांची पूजा भविकांकडून केली जाते. आशीर्वाद मिळण्यासाठी दुर्गा मातेचे भक्त नऊ दिवस उपवास करतात. नवरात्री व्रतच्या नियमांनुसार या दिवसात खाली दिलेल्या काही गोष्टी चुकुनही करू नका.

या गोष्टींचे सेवन करू नका – नवरात्र व्रतच्या नियमांनुसार घरात कलश स्थापित केल्या असल्याने अखंड ज्योत ठेवली जाते किंवा आईचे पद स्थापन केले जाते त्यामुळे घर बंद बठेवू नये. नवरात्रीत कांदा, लसूण आणि मांसाहार करू नये.

या गोष्टी खाऊ शकता – नवरात्रीच्या उपवासात इतर धान्य आणि मीठ नऊ दिवस खाऊ नये. उपवासात तृणधान्य कुट्टूच पीठ, समारी तांदूळ, शिंगाडेचे पीठ, शाबुदाणा, सैंधव मीठ, फळे, बटाटे, शेंगदाणे यांचा समावेश असावा.

कातड्यापासून बनवलेल्या वस्तू वापरु नका – या नऊ दिवसात उपास करणाऱ्यानी लेदर बेल्ट, चप्पल आणि शूज यासारख्या वस्तू वापरू नयेत. नवरात्रीत अशी कोणतीही कामे केली तर त्याचे प्रचंड नुकसान होऊ शकते. म्हणून, आपण या नऊ दिवसांत असे कार्य करणे टाळले पाहिजे.

केस कापू नये – नवरात्रीच्या व्रताच्या नियमांनुसार नवरात्र उपवास ठेवणाऱ्यांजी या दिवसात दाढी-मिशा आणि केस कापू नयेत. यादरम्यान नखे देखील कापू नयेत.

या रंगाचे कपडे वापरू नका – नवरात्रात उपवास ठेवणाऱ्यांनी काळे कपडे घालू नयेत. नवरात्रीच्या दिवशी, दिवसा झोपू नये. तसेच, पलंगावर झोपू नये. माता राणींचा हा उपवास त्याग आणि समर्पण भावनेची शिकवण देतो.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate