पती-पत्नीमध्ये मतभेद असतील हा जप करून पाहा.. होतील फायदे..

पती-पत्नीमध्ये मतभेद असतील हा जप करून पाहा.. होतील फायदे..

भारतीय संस्कृतीमध्ये साता जन्माच्या गाठी पडतात, असे म्हटले जाते. मात्र, सध्याच्या जमान्यात मध्ये लग्न झाल्यानंतर वर्षभरातच कुरबुरी सुरू होतात आणि भांडणे मारामाऱ्या देखील होतात. नंतर हे प्रकरण कोर्टात पर्यंत जाते. दोघांना घटस्फोट घेण्याची वेळ देखील येते. असे का होते याचा विचार कधीही कोणीही करत नाही. घरामध्ये काही दोष आहेत का ? याचा विचार कोणी करत नाही.

दोघांचे स्वभाव हे वेगवेगळे असतात लग्नाआधी एकमेकांचे स्वभाव माहीत नसतात. लग्नानंतर एकमेकांचे स्वभाव माहीत होतात. त्यानंतर एकमेकाच्या गुणावरून भांडण व्हायला सुरुवात होते. मात्र, दोघेही नमते घेत नाही. त्यामुळे हे प्रकरण जास्त चालते. पत्नी धार्मिक असेल तर पती हा धार्मिक नसतो. त्यामुळे देखील खूप भांडणे होतात. अशा प्रकरणात काही धार्मिक उपाय केल्यास निश्चितच उपयोग होऊ शकतो.

मात्र, अनेकांना हे पटत नाही. धार्मिक कारणांमुळे आपल्याला मनशांती लाभत असते. असे केल्याने आपल्याला समाधान प्राप्त होत असते. मात्र, यावर अनेकांचा विश्वास नसतो. तर पती-पत्नीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खटके उडत असतील तर आपण काही धार्मिक उपाय देखील करून पाहावे. आम्ही आपल्याला आज एक असा जप सांगणार आहोत की, हा जप केल्याने पती-पत्नीमध्ये कितीही मतभेद असतील तर ते दूर होऊ शकतात.

असा करा जप…

सकाळी उठून अंघोळ केल्यानंतर एखाद्या जागेवर आसन मांडावे. त्या आसनावर पूर्वेला तोंड करून बसावे. समोर देवी पार्वतीची मूर्ती किंवा चित्र ठेवावे. श्रद्धापूर्वक 21 वेळा या मंत्राचा जप करावा –

अक्ष्यौ नौ मधुसंकाशे अनीकं नौ समंजनम्।
अंत: कृणुष्व मां ह्रदि मन इन्नौ सहासति।।
धां धीं धूं धूर्जटे: पत्नी वां वीं वूं वागधीश्वरी
क्रां क्रीं क्रूं कालिका देवि शां शीं शूं मे शुभं कुरू।।

ज्योतिषानुसार या मंत्राद्वारे लवरच परिणाम प्राप्त होतात आणि जीवनात सुख प्राप्त होते आणि आणि पती पत्नी गुण्यागोविंदाने पुन्हा राहू लागतात, असे शास्त्रात सांगितले आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate