एक चित्रपट आणि डायरेक्ट राष्ट्रीय पुरस्कार, बघा या चिमुकलीचा थक्क करणारा प्रवास!!

एक चित्रपट आणि डायरेक्ट राष्ट्रीय पुरस्कार, बघा या चिमुकलीचा थक्क करणारा प्रवास!!

2015 मध्ये सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट होता. या चित्रपटात सलमानसोबत एक लहान मुलगी होती तिने मुन्नीची भूमिका साकारली होती. ती मुलगी म्हणजे बालकलाकार हर्षाली मल्होत्रा होय.

हर्षालीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. सध्या मुन्नी मोठी झाली आहे. तिला ओळखणंही कठीण आहे.मुन्नी अर्थातच हर्षालीच्या चेहऱ्यामध्ये फारच बदल झाला आहे. नुकताच हर्षालीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

हर्षाली मल्होत्राने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती शेअर केली आहे.
हर्षाली या फोटोंमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना दिसून येत आहे.हा पुरस्कार मिळाल्याने आपण धन्य झाल्याचं हर्षालीने म्हटलं आहे.

पुरस्कार घेताना हर्षाली फारच आनंदी दिसत आहे. यावेळी तिने मल्टीकलरचा ड्रेस परिधान केला होता.हर्षाली मल्होत्रा अलीकडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.हर्षाली मल्होत्राने बनवलेले अनेक रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Team Hou De Viral