देवघरात असलेल्या कळसाच्या नारळाला कोंब आला तर काय करावे ?

देवघरात असलेल्या कळसाच्या नारळाला कोंब आला तर काय करावे ?

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवतेच्या नावाने आपण कलश भरत असतो. अन्य कोणत्याही देवतेच्या नावाने आपण कळस भरतो. आपण जर मंगळवारी शुक्रवारी कुलदेवतेच्या नावाने कलश भरत आहात. का आणि हा कळस आपल्या कुलदेवतेचा असतो. तुम्ही सुद्धा आपल्या घरामध्ये असा कळस भरत असाल. आणि कधी ना कधी त्या कळसावर पुजलेल्या नारळाला कोंब येत असतो.

आपल्या शास्त्रानुसार कोणत्याही पूजेमध्ये नारळ असल्याशिवाय ती पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे कोणत्याही पूजेमध्ये नारळाचा समावेश प्रथम असतो. आणि नारळाला लक्ष्मीचे देखील स्वरूप मानलेले आहे. म्हणून आपण नारळाची कळसावर ठेवून पूजा देखील करतो. किंवा नारळ कुलदेवतेचे प्रतीक म्हणून सुद्धा आपण त्याची पूजा करतो त्यामुळे आपल्यावर आपल्या कुलदेवतेचा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो.

बरेच जण जर असा नारळाला कोंब आला तर घाबरून जातात आणि या नारळाचे काय करावे. असा प्रश्न त्यांना पडतो आणि इतरत्र चौकशी करतात नारळाला कोंब आल्यानंतर घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. कारण कळसावर पुजलेल्या नारळाला कोंब येतच असतो. मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न घेता. त्या ठिकाणी दुसरा नारळ पुजावा. आणि तो कोंब आलेला नारळ कळसावरून बाजूला काढावा.

जो नारळ आपण कळसावर पुजलेला आहे. त्या नारळाला हिरव्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे कोंब येते. आणि असा कोंब पाहून बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. की नाराला कोण का फुटला असेल आणि या नारळाचे आपण करायचे काय यावर एक सोपा उपाय आहे. तो आपण करू शकतो तो उपाय कोणता आहे. त्याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत.

आणि आपण हा जर उपाय केला तर यामुळे काहीही अशुभ होत नाही. जर आपल्या घरातील नारळाला कोंब फुटला असेल किंवा कधी ना कधी फुटेल त्यावेळी काय करावे. कोंब आलेला नारळ कळसावरून काढून त्या ठिकाणी दुसऱ्या नवीन नारळ ठेवून त्या नारळाची पूजा करावी. आणि तो कोंब आलेल्या नारळ आपण कोणत्याही मंदिरामध्ये लावू शकता. किंवा त्या नारळाचे झाड आपल्या बागेमध्ये आपण लावू शकतो.

ते नारळ इतरत्र लावण्यापूर्वी थोड्या दिवसासाठी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तो नारळ त्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर तो नारळ जमिनीमध्ये एक खोल खड्डा करून त्या खड्ड्यांमध्ये तो नारळ ठेवावा. आणि दररोज त्याला पाणी घालावे म्हणजे त्या कोंबाचे रोप तयार होईल. आणि हळूहळू त्याचे झाडांमध्ये रूपांतर होईल. जर ते झाड आपल्याला आपल्या अंगणामध्ये पाहिजे.

आपण आपल्या अंगणामध्ये लावू शकता. किंवा एखाद्या मंदिरामध्ये देखील ते देऊ शकता. वर लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण कोण आलेल्या नारळाचा उपाय करू शकतो. नारळाला कोंब आल्यावर तो नारळ काढून त्या ठिकाणी दुसरा नारळ पुजावा याने कोणतेही अशुभ होत नाही. आणि तो कोंब आलेला नारळ एखाद्या मंदिरामध्ये किंवा आपल्या दारामध्ये लावावा.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Ritesh Bhairat