nagraj manjule appreciate jitendra joshi godavari film | ‘गोदावरी’ पाहिल्यानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

nagraj manjule appreciate jitendra joshi godavari film | ‘गोदावरी’ पाहिल्यानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाची हवा आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला आहे. या प्रीमियरला अनेक मराठीतले कलाकार उपस्थित होते. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकरांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात आता प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची भर पडली आहे. नागराज मंजुळे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे.

अभिनेता जितेंद्र जोशीची मुख्य भूमिका असलेल्या ‘गोदावरी’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अशात आता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचं कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे. नदी आणि मानवी नाते संबंध यांची उत्तम गुंफण बांधणारा अभिनेता जितेंद्र जोशीचा गोदावरी चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही गाजला होता. या चित्रपटाचं कौतुक करताना नागराज मंजुळे यांनी चित्रपटाला शुभेच्छाही दिल्या आहेत.

आणखी वाचा- Movie Review : नदी आणि मानवी नातेसंबंध यांची उत्तम गुंफण बांधणारा ‘गोदावरी’

नागराज मंजुळे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये त्यांनी जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शक निखिल महाजन यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी लिहिलं, “‘गोदावरी’ उद्या ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय. निखिलचा दिग्दर्शक म्हणून सर्वोत्तम चित्रपट. माझ्या मते जितेंद्रचं आजवरचं सर्वोत्कृष्ट काम… ए व्ही प्रफुल्लचंद्र यांचं संगीत आणि पार्श्वसंगीतही खूप अर्थवाही! ‘गोदावरी’ची खळखळ वाहणारी अस्वस्थता आपल्यालाही ग्रासून घेते. आवर्जून बघा! अभिनंदन आणि मनःपूर्वक सदिच्छा!

आणखी वाचा- “मी त्यावेळी दारोदारी फिरत होतो पण…” जितेंद्र जोशीने सांगितला महेश मांजरेकरांचा ‘तो’ किस्सा

येत्या ११ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात विक्रम गोखले. संजय मोने, नीना कुलकर्णी असे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. नुकतंच या चित्रपटातील ‘खळ खळ गोदा’ हे गाणं प्रदर्शित झालं आणि लोकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. निखिल महाजन यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे त्यांनी याआधी ‘जून’, ‘बाजी’ ‘पुणे ५२’ अशा चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा ए.व्ही.प्रफुल्लचंद्रा यांच्या खांद्यावर आहे. अभिनेता जितेंद्र जोशीने हा चित्रपट दिग्दर्शक निशिकांत कामत यांना समर्पित केला आहे.

Aniket Ghate