mns vs ncp over har har mahadev film film show in viviana mall is forcefully stopped by NCP now avinash jadhav commented on this incident spg 93 | ‘हर हर महादेव’वरुन वाद : “प्रेक्षकांना मारहाण करणं ही कुठली संस्कृती?”; मनसेचा आव्हाडांना सवाल

mns vs ncp over har har mahadev film film show in viviana mall is forcefully stopped by NCP now avinash jadhav commented on this incident spg 93 | ‘हर हर महादेव’वरुन वाद : “प्रेक्षकांना मारहाण करणं ही कुठली संस्कृती?”; मनसेचा आव्हाडांना सवाल

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘हर हर महादे’व चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत आहे. पहिल्या दिवशी तब्बल २ कोटी २५ लाख रुपये इतपत कमाई चित्रपटाने केली. . मात्र आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ठाण्यातील विवीयाना मॉलमधील चित्रपटगृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले होते.

या घटनेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि प्रेक्षक यांच्यात हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. घडलेल्या प्रकारावर मनसेचे अविनाश जाधव घटनास्थळी पोहचले. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “चित्रपटगृहात येऊन प्रेक्षकांना मारझोड करणं हे कोणत्या संस्कृतीला धरून आहे? तुम्ही नेहमी संस्कृतीच्या गोष्टी करता ना? ही कुठली संस्कृती होती? हा चित्रपट आम्ही इथे बसून पाहणार. चित्रपटगृहात येऊन प्रेक्षकांना मारणं हे तुम्हाला कोणी शिकवलं?” या शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच “हा चित्रपट आम्ही इथे बसून बघणार,” असा पवित्रा त्यांनी घेतला.

हर हर महादेव चित्रपट विरोध : जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुण्यातदेखील संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी शहरामध्ये सुरू असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडला होता. अविनाश जाधव यांच्याबरोबरीने मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही ट्वीटरवरुन या प्रकारावरुन संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यामुळे चित्रपटगृहात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. छत्रपती संभाजीराजे यांनी नुकतीच पुण्यात एक पत्रकार परिषद घेऊन मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना इशारा दिला होता.

दरम्यान या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर हे मुख्य भूमिकेत आहेत . ‘हर हर महादेव’ चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड या भाषांमध्येही प्रदर्शित करण्यात आला आहे. पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

Aniket Ghate