प्रसिद्ध अभिनेते मिथुन बाबत आली वाईट बातमी !

प्रसिद्ध अभिनेते मिथुन बाबत आली वाईट बातमी !

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या चाहत्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. सोशल मीडियावर मिथुन चक्रवर्ती यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ते रुग्णालयात बेडवर झोपलेले दिसत आहेत.

सोशल मीडियावर मिथुन चक्रवर्ती यांचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा उडताना दिसत आहेत. ज्यामुळे त्यांचे चाहते देखील हैराण झाले आहेत. रुग्णालयात असलेल्या मिथुन चक्रवर्ती यांचा फोटो वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर केला जात आहे.

मिथुन चक्रवर्ती यांना अशाप्रकारे रुग्णालयातील बेडवर पाहिल्यानंतर त्यांना नेमकं काय झालंय? त्यांची तब्येत तर ठीक आहे ना? अशा प्रकारे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. पण चिंतेचं काही कारण नाही. मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलानं त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देत चाहत्यांची चिंता दूर केली आहे.

मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्तीनं वडिलांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्याने सांगितलं, “मिथुन चक्रवर्ती यांना किडनी स्टोनची समस्या आहे. त्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोंमध्ये ते बेशुद्धावस्थेत बेडवर झोपलेले दिसत आहेत.

पण खरं तर त्यांची तब्येत आता अगदी व्यवस्थित असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. आता ते फिट आहेत त्यामुळे चिंता करण्याचं काहीच कारण नाहीये.” मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला असून ते त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

याशिवाय भाजपाचे राष्ट्रीय सचिव डॉ. अनुपम हाजरा यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवर मिथुन चक्रवर्ती यांचे फोटो शेअर करत लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना केली आहे. दरम्यान मिथुन चक्रवर्ती अलिकडच्या काळात ‘हुन्नरबाज’ शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसले होते. तसेच त्यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ मधील भूमिकेचंही बरंच कौतुक झालं होतं.

Aniket Ghate