mimi actress sai tamhanakar confessed that she was faced mental health problems in lockdown spg 93 | “मी सात महिने घरात…”; सई ताम्हणकरचा मानसिक तणावाबद्दल मोठा खुलासा

mimi actress sai tamhanakar confessed that she was faced mental health problems in lockdown spg 93 | “मी सात महिने घरात…”; सई ताम्हणकरचा मानसिक तणावाबद्दल मोठा खुलासा

नुकताच मानसिक आरोग्य दिवस होऊन गेला. आज देशातच नव्हे तर जगभरात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तणावाखाली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोणने नैराश्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली होती, ती असं म्हणाली होती जेव्हा मी नैराश्यात होते तेव्हा मला माझा कुटुंबाने आईने त्यातून बाहेर काढले. हिंदी मराठी चित्रपटसृष्टीत वाढवता स्पर्धा, स्टाररडम यामुळे कलाकार नैराश्यात जातात. दीपिकाच्या पाठोपाठ आता मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने मानसिक तणावाबद्दलआपली प्रतिक्रिया दिली आहे.

सई ताम्हणकरने केवळ मराठी चित्रपटसृष्टीत नव्हे तर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतेच आऊटलूकला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की हो ‘मीदेखील नैराश्याचा सामाना केला आहे. ती असं म्हणाली की, अर्थात, मला मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. मला याची जाणीव होती याचा मला आनंद आहे. माझ्या भल्यासाठी मला सल्ला देणारे लोक होते. कधी कधी तुमच्यासोबत काहीतरी घडतं आणि तुम्ही ते ओळखूही शकत नाही’.

राज ठाकरेंनी भरत जाधवच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटाला दिला होता आवाज; तुम्ही पाहिलाय का?

ती पुढे म्हणाली, ‘मानसिक आजाराचा सामना करण्याचा माझा अनुभव करोनाच्या पहिल्या लाटेत आला होता. जेव्हा माझा पाय तुटला होता, हे खूप हास्यस्पद आहे की मी ७ महिने घरीच होते. मी त्यासाठी थेरपी घेतली मला जाणवत होते की मी स्वतःपासून दूर जात आहे मात्र मी स्वतःला सावरले आणि पुन्हा एकदा रुळावर आले. त्या अनुभवाने मला मजबूत आणि अधिक जागरूक केले आहे. आणि यामुळे मला अधिक संवेदनशील व्यक्ती बनले आहे’.

‘मिमी’च्या यशानंतर सई पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करत आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटात ती महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसेल. तर लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. लवकरच ती मधुर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाउन’मध्येही दिसणार आहे.

सईने मराठी मालिका, चित्रपटातून आपल्या करियरची सुरवात केली आहे. ‘दुनियादारी’, ‘नो एंट्री’, ‘मीडियम स्पायसी’, ‘बालक पालक’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट्स’ यांसारख्या मराठी चित्रपटातून काम केले आहे. सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेत ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे.

Aniket Ghate