रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ‘त्या’ किलोमीटर दर्शविणाऱ्या दगडांचा रंग वेगवेगळा का असतो, जाणून घ्या त्यामागचे कारण

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ‘त्या’ किलोमीटर दर्शविणाऱ्या दगडांचा रंग वेगवेगळा का असतो, जाणून घ्या त्यामागचे कारण

रस्त्याच्या कडेला तुम्ही ‘माइल स्टोन’, म्हणजेच किलोमीटर दर्शविणारे दगड बघितलेच असतील, ज्यावर एखाद्या जागेचे अंतर आणि त्या ठिकाणचे नाव लिहिलेले असते. आणि या दगडांचा वरचा भाग पिवळा, हिरवा, काळा आणि नारंगी रंगाने रंगलेले असतात. तर सर्व दगडांच्या खालच्या भागाला पांढऱ्या रंगाने रंगवलेले असते. पण तुम्हाला माहिती आहे का माईल स्टोनचे (ठिकाणचे अंतर सांगणारे) हे दगड वेगवेगळ्या रंगाचे का असतात?

महामार्ग किंवा कोणत्याही गावातून जाताना बहुतेकदा आपल्याला असे दगड दिसतील. त्यावर लिहिलेले अंतर सोडल्याखेरीज आपण इतर कशाकडेही विशेष लक्ष देत नाहीत, परंतु हे वेगवेगळ्या रंगाचे दगड हे खूप कामाचे असतात. आणि ते कशाप्रकारे हे फारच कमी लोकांना माहिती असते.

पिवळ्या रंगाचे माइल स्टोन – रस्त्यावर फिरताना किंवा वाहन चालवताना, रस्त्याच्या बाजूला एक असा दगड असतो, ज्याचा वरचा भाग जर पिवळा रंगाचा असेल तर हे समजून घ्या की आपण नॅशनल हायवे किंवा राष्ट्रीय राजमार्गावर चालत आहात.

हिरव्या रंगाचे माइल स्टोन – जर तुम्हाला रस्त्याच्या कडेला हिरव्या रंगाचे माइल स्टोन दिसला तर याचा अर्थ असा आई की आपण राज्य राजमार्गावर आहात. राज्यात जेव्हा रस्ते बांधले जातात तेव्हा हिरव्या दगडांचा वापर केला जातो. हे रस्त्याची देखभाल संपूर्णपणे राज्यसरकार करत असते.

काळ्या, निळ्या आणि पांढर्‍या पट्ट्यांचे माइल स्टोन – या प्रकारचे माइल स्टोन म्हणजे आपण एखाद्या मोठ्या शहरात किंवा जिल्ह्याच्या आत आहात, तसेच या रस्त्याची देखभाल जिल्ह्यातच अंतर्गत किंवा केवळ त्या शहराच्या कारभाराद्वारे केली जाते.

नारंगी रंगाचे माइल स्टोन – नारंगी रंगाचे दगड आपण गावात असाल तेव्हा असे दगड आपल्याला बघायला मिळतील. या दगड प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना देखील दर्शवितात.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate