धक्कादायक ! फक्त या कारणामुळे ‘हृता’ वर होतेय मोठा प्रमाणात टीका, चाहते जाम भडकले आहेत

धक्कादायक ! फक्त या कारणामुळे ‘हृता’ वर होतेय मोठा प्रमाणात टीका, चाहते जाम भडकले आहेत

सध्या छोट्या पडद्यावर मन उडू उडू झालं ही मालिका लोकप्रिय होताना दिसत आहे. या मालिकेतील सगळ्याच भूमिका चांगल्या झालेले आहेत. मात्र असे असले तरी या मालिकेतील ह्रुता दुर्गुळेची बहुबली खूप गाजत आहे. तसेच या मालिकेमध्ये अनेक कलाकार सहभागी झाले आहेत.

इंद्रा आणि दिपू यांची प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे. मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने दिपू ही भूमिका साकारली आहे, तर इंद्रा ही भूमिका अभिनेता अजिंक्य राऊत याने साकारली आहे. या मालिके मधील देशपांडे कुटुंबीय यांची कहाणी आहे. देशपांडे कुटुंबीयांमध्ये शलाका सानिका या मुली दाखवण्यात आलेल्या आहेत, तर इंद्रा आणि कार्तिक भाऊ दाखवले आहेत.

कार्तिक आणि सानिका यांचे प्रेम प्रकरण या मालिकेत सध्या सुरु आहे. सानिका ही कार्तिक या मुलाची आई बनणार असते आणि सानिकाला ही गोष्ट त्याच्या घरच्यांना सांगायची असते. मात्र, कार्तिक आपली जबाबदारी ढकलत असतो. याचा परिणाम इंद्रा व दिपू यांच्या नात्यावर होताना दिसत आहे.

अजिंक्य राऊत याने याआधी देखील अनेक मालिकेत काम केले आहे. हृता दुर्गुळे हिने देखील मालिकेत चांगले काम केलं आहे. हृता दुर्गुळे ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सोशल मीडिया वर ती आपले अनेक फोटो देखील शेअर करत असते. तिच्या या फोटोला चहाते देखील खूप लाईक करत असतात.

हृता दुर्गुळे बाबतचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हृता वर अनेकांनी टीका देखील केली आहे. हृता दुर्गुळे हिने नुकतीच आपल्या चाहत्यांना एक खूषखबर दिली होती. ही खुशखबर म्हणजे तिने इंस्टाग्रामवर आपले जवळपास दोन मिलियन फॉलोवर झाल्याचे म्हटले होते.

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोईंग असणारी ती एकमेव अभिनेत्री असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे देखील हृताची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. आता हृता हिच्यावर सोशल मीडियावर टीका होण्याचे कारण म्हणजे तिचा प्रियकर आहे. हृता हिच्या प्रियकराचे नाव प्रतीक शहा आहे.

त्यांच्या सोबत गेल्या काही दिवसापासून तिचे प्रेम प्रकरण सुरू आहे. प्रतीक हा मराठीतील मुग्धा शहा या ज्येष्ठ अभिनेत्रीचा मुलगा आहे. मुग्धा शहा यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम केले आहे. प्रतीक आणि हृता गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे सांगण्यात येते.

मात्र, आता तिला ट्रोल करण्याचे कारण म्हणजे तिने हिंदी मध्ये काम करण्यासाठी प्रतीक याला पटवले आहे. ती प्रतीक सोबत लग्न करणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, मराठी मुले तुला भेटले नाहीत का? असं देखील तिला अनेक जण म्हणत आहेत. या टीकेनंतर हृता मात्र चांगलीच खजील झाली आहे.

कारण प्रेमात कुठलीही जात पाहून प्रेम करता येत नाही. मात्र अशा प्रकारे टीका होत असल्याने ती नाराज झाली आहे.

Aniket Ghate