मीनाक्षी शेषाद्री एकवेळची सर्वात यशस्वी अभिनेत्री, मग असे काय घडले की तिने सोडली चित्रपटसृष्टी??

अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री तिच्या ८० आणि ९० च्या दशकाच्या सुपरहिट अभिनेत्रींपैकी एक होती, तिने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने चाहत्यांच्या अंतःकरणावर वेगळी छाप सोडली. तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याच्या जोरावर तिने बरंच नाव कमावलं पण इतकी उंची गाठल्यानंतर मीनाक्षीने अचानक फिल्म इंडस्ट्रीला निरोप दिला.
आपल्या चित्रपट कारकिर्दीत तीने अनेक मोठ्या चित्रपटांत काम केले आहे. ऋषि कपूरपासून सनी देओलपर्यंत मीनाक्षीची जोडी पडद्यावर सुपरहिट होती. ‘विजय’, ‘साधना’, ‘दामिनी’, ‘बडे घर की बेटी’ आणि ‘घराना’ या चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी अचानक चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला.
१६ नोव्हेंबर १९६३ रोजी जन्मलेल्या मीनाक्षीने तिच्या सौंदर्याने अनेक कलाकारांना वेड लावले होते. तीचे नाव अनिल कपूरपासून गायक कुमार सानूशी जोडले गेले होते. मीनाक्षी आणि कुमार सानूच्या अ फे अरच्या बातमी बरेच दिवस चर्चेत होती. त्यावेळी सानूचे लग्न झाले होते, परंतु त्यानंतरही सानू आणि मीनाक्षीचे लग्न होईल अशी चर्चा होती.
कुमार सानू आणि मीनाक्षी शेषाद्री यांची महेश भट्टच्या ‘जूर्म’ या चित्रपटाच्या सेटवर पहिली भेट झाली. यानंतर हे दोघे अनेक प्रसंगी एकत्र दिसले. सुत्रांनुसार कुमार सानू आणि मीनाक्षी यांनी आपलं प्रेम प्रकरण तीन वर्ष लपवून ठेवलं होतं. या दोघांच्या अफेअरमुळे सानूचे वैवाहिक आयुष्यही बिघडत चालले होते आणि जवळजवळ घ ट स्फो टापर्यंत पोहोचला होता.
मात्र नंतर सानू आणि मीनाक्षी एकमेकांच्या संमतीने विभक्त झाले. यशस्वी झाल्यानंतरही मिनाक्षीने चित्रपटांना निरोप दिला. मीनाक्षीने १९९५ मध्ये बँकर हरीश म्हैसूरशी लग्न केले. लग्नानंतर ती अमेरिकेच्या टेक्सास शहरामध्ये राहायला गेली.
मीनाक्षी तिची स्वत: ची नृत्य शाळा देखील चालवते, जी तिने २००८ मध्ये चेरीश डान्स स्कूलच्या नावाने सुरू केली होती. मीनाक्षी जरी आता चित्रपटांपासून दूर असली तरीही तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते अजूनही उत्साही असतात.