“आणि मी प्रेमात पडले”…. बघा शनायाची खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरी!!!

“आणि मी प्रेमात पडले”…. बघा शनायाची खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरी!!!

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनायाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी जीवनामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. रसिकाने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोशल मीडियावर एका तरुणासोबत फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर तिने एका मुलाखतीमध्ये “होय, मी आदित्य बिलागीला डेट करतेय.

आम्ही दोघंही सध्या लॉस एंजिलिसमध्ये आहोत आणि एकमेकांसोबत वेळ घालवत आहोत. मी खूप आनंदी आहे” असे म्हटले होते. पण आदित्य आणि रसिकाची ओळख कशी झाली कुठे झाली असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. व्हॅलेंटीन डे निमित्त जाणून घेऊया रसिका सुनील आणि आदित्यची लव्हस्टोरी.

नुकतीच रसिका आणि आदित्यने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखीतमध्ये त्यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे. तेव्हा रसिका म्हणाली, ‘दीड-दोन वर्षे आम्ही मित्रमैत्रीण म्हणून आहोत. आम्ही मागच्या वर्षीच प्रेमात पडलो.

त्यामुळे आम्ही प्रेमात पडलो अन् करोना आला असं काही तरी झालं. हा जानेवारीमध्येच भारतात आला. मी त्याला घ्यायला एअपोर्टला गेले होते. तेव्हा त्याच्या मनात काही तरी सुरु होतं. एकदिवस तो मला म्हणाला मला तुला काही सांगायचं आहे. पण खूप मोठा प्रॉब्लम आहे. मला काही कळेना की प्रॉब्लम काय आहे. कारण मी त्या नजरेने त्याला पाहत नव्हते. पण मला तो आवडयाचा आधीपासून.

पण मित्र होता त्यामुळे असा विचार केला नव्हता. त्यानंतर एक दिवस आम्ही एका पार्टीला गेलो. माझे काही मित्रमैत्रीणी अमेरिकेहून आले होते. त्यांच्यासोबतच आम्ही पार्टीला गेलो होतो. त्यानंतर तेथून निघताना मला जाणवलं कि याला काय बोलायचं आहे मला कदाचित कळालं आहे. म्हणून मी याला किडनॅप करुन बँडस्टाइनला घेऊन गेले.’

पुढे आदित्य म्हणाला, ‘आम्ही मस्त फिरत होतो. नंतर कॉफी प्यायला गेलो. तिथे वरतून विमानं उडत असताना आम्ही ती बघत होता आणि ती विमाने पाहून तिला बाबांची आठवण येते असं ती म्हणत होती.

कारण तिचे बाबा अमेरिकेत असतात. तेव्हा मी माझ्या मनातलं सांगितलं की प्रॉब्लम हाच आहे की मी पण चार आठवड्यात जाणार आहे पुन्हा अमेरिकेला. तेव्हा तिला मी थोडी आयड्या दिली की तू मला आवडते.’

तेव्हा रसिका म्हणाली, तेव्हा मला काळालं की तू इथे असणार आणि मी अमेरिकेत हा मोठा प्रॉब्लम आहे हे मला कळालं.आदित्य मूळचा औरंगाबादचा आहे. गेली ९ वर्षे तो अमेरिकेत राहत आहे. तो सीनीअर सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. तसेच तो कमाल डान्सर आहे. त्याचे स्वत:चे युट्युब चॅनेल आहे.

Aniket Ghate