दोनदा संसार मोडल्यानंतर ११ वर्षांनी लहान अभिनेत्या सोबत रिलेशनशिपमध्ये होती बिगबॉस मराठी मधील ही अभिनेत्री!!

दोनदा संसार मोडल्यानंतर ११ वर्षांनी लहान अभिनेत्या सोबत रिलेशनशिपमध्ये होती बिगबॉस मराठी मधील ही अभिनेत्री!!

‘बिग बॉस’ म्हटलं की वा द-विदाद, प्रेमप्रकरणं हे सर्व आलं. सध्या बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या पर्वातील सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती स्पर्धक स्नेहा वाघ हिची. स्नेहाचं खासगी आयुष्याची प्रचंड चर्चा सुरू झाली आहे.

स्नेहाचं सिनेकरिअर चांगलं राहिलं असलं तरी तिच्या खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. स्नेहाचं वैवाहिक आयुष्य इतकं चांगलं राहिलं नाही. एकदा नव्हे तर दोनदा तिचा संसार मोडला. दोन वेळा घ ट स्फो ट झाल्यानंतर लग्नसंस्थेवरचा विश्वासच उडाल्याचं स्नेहानं म्हटलं आहे.

वयाच्या १९ व्या वर्षी स्नेहाचा विवाह अभिनेता अविष्कार दारव्हेकरसोबत झाला होता. मात्र, काही वर्षात हे नातं संपुष्टात आलं. त्यानंतर २०१५मध्ये स्नेहानं अनुराग सोळंकीसोबत पुन्हा संसार थाटला होता. मात्र, हा संसारही फार काळ टिकू शकला नाही. लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यातच दोघेही वेगळे झाले होते.

काही महिन्यांपूर्वी स्नेहाचं नाव तिच्याहून ११ वर्षांनी लहान असलेल्या डान्सर आणि अभिनेता फैजल खान याच्यासोबत जोडलं जात होतं. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु दोघांनीही या नात्याला नकार देत या अफवा असल्याचं म्हटलं होतं. परंतु फैजलची गर्लफ्रेंड मुस्कान कटारिया हिनं फैजल आणि स्नेहा यांच्यात जवळीक वाढल्याचे आ रो प केले होते.

कोण आहे स्नेहा वाघ?

‘काटा रुते कुणाला’ या मराठी मालिकेतून स्नेहा भेटीला आली होती. तिची ही मालिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर तिनं ‘वीरा’, ‘ज्योती’ अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं.

Team Hou De Viral