marathi actress kranti redkar shared photo with union minister ramdas aathavle spg 93 |क्रांती रेडकरच्या घरी ‘या’ केंद्रीय मंत्र्याने दिली भेट, फोटो व्हायरल

marathi actress kranti redkar shared photo with union minister ramdas aathavle spg 93 |क्रांती रेडकरच्या घरी ‘या’ केंद्रीय मंत्र्याने दिली भेट, फोटो व्हायरल

सध्या देशात आनंदाचे वातावरण आहे. दिवाळी सणाला कालपासून सुरवात झाली. सामान्य जनतेपासून ते सेलिब्रेटी लोकांपर्यंत सर्वजण हा सण आनंदाने साजरा करत आहेत. बॉलिवूड प्रमाणे मराठी कलाकारदेखील यावर्षी उत्साहाने सण साजरा करत आहेत. अभिनेत्री, दिग्दर्शिका क्रांती रेडकरनेदेखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटनवरून माहिती देत हा सण साजरा केला आहे. दिवाळी निमित्त तिच्या घरी ‘रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया’चे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या.

क्रांती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. तिने आपल्या ऑफिसमधल्या लक्ष्मीपूजनाचे फोटोदेखील शेअर केले आहेत. त्यानंतर आपल्या घरातील फोटो शेअर केले आहेत. रामदास आठवले त्यांच्या पत्नी आणि पूर्ण कुटुंबरोबरचा फोटो शेअर करत तिने कॅप्शन दिला आहे ‘आजच्या शुभ दिवशी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आमच्या घरी भेट दिली आहे’. अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबरीने सगळ्यांनी एकत्र फराळदेखील केला आहे.

‘या’ मराठमोळ्या दिग्दर्शकाने थेट गुजरातमधून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; म्हणाला…

अभिनेत्री क्रांती रेडकर एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी आहे. आर्यन खान प्रकरणामुळे हे दोघे चांगले चर्चेत होते. अभिनेत्री क्रांती रेडकर मध्यंतरी चित्रपटसृष्टीपासुन दूर होती मात्र ती आता पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसून येत आहे. अभिनेत्रीला दिग्दर्शिका म्हणून आपण बघितले आहे. आता ती निर्माती म्हणून आपल्यासमोर येणार आहे.

क्रांती तिच्या निर्मिती संस्थेद्वारे ती एका रिॲलिटी शोची प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या बरोबरीने निर्मिती करणार आहे. याआधी तिने काकण नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याचबरोबरीने ‘जत्रा’, ‘ऑन ड्युटी २४ तास’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे.

Aniket Ghate