सोनाली खरेचा पती आहे ‘हा’ प्रसिद्ध पंजाबी अभिनेता

सोनाली खरेचा पती आहे ‘हा’ प्रसिद्ध पंजाबी अभिनेता

अभिनेत्री सोनाली खरे हिने चित्रपट, मालिका व नाटक माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मालिका किंवा चित्रपटाच्या सेटवर कलाकारांचे प्रेम जुळणे आणि नंतर त्यांनी लग्न करणे ही काही नवीन गोष्ट नाही. सोनाली खरे सोबतही असेच झाले आणि पंजाबी कलाकार बिजय आनंद याच्या प्रेमात ती पडली.

आजच्या या पोस्टमध्ये तिच्या लव्हसेटोरीबद्दल आपल्याला सांगणार आहोत. वाचा, कशी आणि कुठे झाली सोनाली-बिजयची भेट…

मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केलेला अभिनेता बिजय आनंदसोबत सोनालीने लग्न केले आहे. बिजय आणि सोनाली यांची भेट ‘रात होने को है’ या मालिकेदरम्यान झाले होते. या मालिकेतील एका एपिसोडमध्ये त्यांनी सोबत काम केले आणि त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला.

कोण पुढाकार घेणार अशी होती द्वीधा मनस्थिती..

सोनाली आणि बिजय हे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते पण कोण पुढाकार घेणार असा गोँधळ दोघांच्या मनात सुरु होता. अखेर बिजय यांनी पुढाकार घेऊन सोनालीला प्रपोज केले. दोन-अडीच वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर सोनाली आणि बिजय यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. आज या दोघांना एक मुलगी आहे तिचे नाव सानया आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate