marathi actor siddharth jadhav dancing on dada kondke song video viral spg 93 | दादा कोंडकेंच्या सुपरहिट गाण्यावर सिद्धार्थ जाधवने केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

marathi actor siddharth jadhav dancing on dada kondke song video viral spg 93 | दादा कोंडकेंच्या सुपरहिट गाण्यावर सिद्धार्थ जाधवने केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

देशात सध्या आनंदाचे वातावरण आहे. दिवाळी सण असल्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. मात्र वरुणराजाच्या आगमनाने सध्या बळीराजापासून ते सामान्य नागरिकापर्यंत सगळेच चिंतेत पडले आहेत. अवकाळी पडणाऱ्या या पावसामुळे पुण्यासारख्या शहरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाळ्यात अनेकांना गाणी आठवतात. मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या चर्चेत आहे. पावसावरच्या एका प्रसिद्ध गाण्याने तो चर्चेत आला आहे.

आपल्या विनोदाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्याने दादा कोंडेक यांच्या ‘ढगाला लागली कळ’ या प्रसिद्ध गाण्यावर त्यांचाच गेटअप करून डान्स केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. त्याचे चाहतेदेखील यावर कॉमेंट करत आहेत.

“या माणसाला मी…”; राजामौलींबाबत ए. आर. रहमान यांनी दिली प्रतिक्रिया

दादांची आठवण करून दिलीस, लई भारी भावा, कडक अशा शब्दात नेटकऱ्यांनी त्याचे कौतूक केले आहे. सिद्धार्थ सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. आपल्या आगामी चित्रपटांची फोटोशूट या गोष्टी तो शेअर करत असतो. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरवात एकांकिका, मराठी नाटकांपासून केली आहे. आत तो थेट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करायला लागला आहे.

साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपतीबरोबर सिद्धार्थ आता एका चित्रपट झळकणार आहे. ‘गांधी टॉक्स’ असं या चित्रपटाचे नाव असून सिद्धार्थच्या बरोबरीने या चित्रपटात अरविंद स्वामी, आदिती राव हैदरी महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. झी स्टुडिओज, क्युरियस डिजिटल आणि मुव्ही मिल एंटरटेनमेंट हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Aniket Ghate