marathi actor pravin tarde wishesh happy diwali through his instagram post spg 93 | प्रवीण तरडे यांनी दिल्या दिवाळीच्या हेल्दी शुभेच्छा! व्यायामशाळेतला फोटो शेअर करत म्हणाले…

marathi actor pravin tarde wishesh happy diwali through his instagram post spg 93 | प्रवीण तरडे यांनी दिल्या दिवाळीच्या हेल्दी शुभेच्छा! व्यायामशाळेतला फोटो शेअर करत म्हणाले…

‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’, ‘सरसेनापती हंबीरराव’ अशा वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट देणारे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे कायमच चर्चेत असतात. सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटानंतर ते शेतीच्या कामामध्ये रमले होते. पण आता पुन्हा एकदा प्रवीण यांनी आपल्या नव्या चित्रपटाच्या कामाला सुरुवात केली आहे. याची माहिती त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटनवरून दिली होती. आता त्यांनी दिवाळीची शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रवीण तरडे यांनी व्यायामशाळेतला फोटो शेअर करत या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिला आहे दिवाळीच्या आरोग्यमय शुभेच्छा अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रवीण तरडे कायमच उत्तम आरोग्याबाबत संदेश देत असतात. याआधीदेखील त्यांनी अनेक वेळा व्यायामशाळेतील फोटो शेअर केले आहेत. तसेच त्यांचे शेती करतानाचे फोटो चर्चेत असतात.

Photos : क्रिती सेनॉनची धमाकेदार दिवाळी पार्टी; पण चर्चा मात्र मराठमोळ्या सई ताम्हणकरचीच! पाहा फोटो

प्रवीण तरडे अनेक वर्ष चित्रपट, नाट्यसृष्टीत कार्यरत आहेत. मध्यंतरी ते कामामधून निवांत वेळ मिळाल्यानंतर पत्नी स्नेहल तरडेबरोबर लंडन येथे फिरण्यासाठी गेले होते. प्रवीण तरडे यांनी आपल्या करियरची सुरवात मराठी एकांकिकांपासून केली, मालिका लेखन, चित्रपट लेखन आता अभिनय दिग्दर्शन असा त्यांचा प्रवास आहे.

प्रवीण तरडे यांचे चाहते त्यांच्या पुढील चित्रपटाची वाट बघत आहेत. ‘सरसेनापती हंबीरराव’, धर्मवीर या चित्रपटानंतर त्यांच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सलमानच्या ‘राधे’ चित्रपटातदेखील त्यांनी काम केले होते. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात आला होता ज्यात सलमानने काम केले होते.

Aniket Ghate