प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींच्या खऱ्या मुली बघा

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींच्या खऱ्या मुली बघा

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत की, ज्यांच्या खऱ्या मुली अनेकांनी पाहिल्या नाहीत. तर अनेक अशा अभिनेते आहेत की ज्यांच्या मुली या मराठी चित्रपट सृष्टी मध्ये कार्यरत आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर आपण सचिन पिळगावकर यांचे देऊ शकतो.

सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर हीदेखील मराठी चित्रपट सृष्टी मध्ये कार्यरत आहे. त्याचप्रमाणे इतर अभिनेत्यांचे देखील असेच आहे. आज आम्ही आपल्याला काही अशा अभिनेत्री सांगणार आहोत आणि त्यांच्या मुली देखील सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

1) सुलेखा तळवलकर – सुलेखा तळवलकर या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. त्यांची मुलगी टीया तळवलकर हीदेखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या मुलीसोबतचे सुलेखा या फोटोदेखील शेअर करत असतात.

2) सुप्रिया पिळगावकर – सुप्रिया पिळगावकर या मराठी चित्रपटसृष्टी मधील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. सुप्रिया यांचे पती सचिन पिळगावकर हे देखील ज्येष्ठ अभिनेते आहेत. या दोघांना श्रिया पिळगावकर ही मुलगी असून ती देखील अभिनेत्री आहे.

3) लीना भागवत – लीना भागवत यादेखील एक ज्येष्ठ अभिनेत्री असून अनेक मालिका आणि चित्रपटात देखील त्यांनी काम केले आहे. त्यांच्या मुलीचे नाव पूर्वा कदम असे आहे.

4) हर्षदा खानविलकर – हर्षदा खानविलकर यांनी देखील आणि मालिका चित्रपटात काम केले आहे. हर्षदा खानविलकर यांनी संजय जाधव याच्याशी लग्न केले असून या दोघांना मृणाल जाधव ही मुलगी आहे.

5) शिल्पा तुळसकर – शिल्पा तुळसकर या मराठीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. सध्या त्या तू तेव्हा तशी या मालिकेत दिसत आहेत. त्यांची मुलगी देखील या क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगण्यात येते.

6) समिधा गुरू – समिधा गुरू यादेखील मराठी चित्रपट सृष्टी मध्ये आघाडीच्या अभिनेत्री आहेत त्यांनी अनेक मालिकांत काम केले आहे. त्यांच्या मुलीचे नाव दुर्वा गुरु असे आहे.

7) शुभांगी गोखले – शुभांगी गोखले या मराठीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. त्यांची मुलगी देखील अभिनेत्री असून तिचे नाव सखी गोखले असे आहे.

8) भार्गवी चिरमुले – भार्गवी हीदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून तिने मालिका, चित्रपट नाटक या सगळ्या क्षेत्रात काम केले आहे. तिच्या मुलीचे नाव शुभवी गुप्ते असे आहे.

9) मधुराणी प्रभुलकर – मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. मधुराणी प्रभुलकरच्या मुलीचे नाव स्वराली प्रभुलकर असे आहे.

10) उर्मिला कोठारे – उर्मिला कोठारे आदिनाथ कोठारे याची बायको आहे. या दोघांना एक मुलगी असून तिचे नाव जिजा कोठारे असे आहे.

Aniket Ghate