तू बुधवार पेठेतील आहेस अस म्हणाऱ्याला ‘या’ अभिनेत्रीने अस काही उत्तर दिलय की जाणून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल!!

तू बुधवार पेठेतील आहेस अस म्हणाऱ्याला ‘या’ अभिनेत्रीने अस काही उत्तर दिलय की जाणून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल!!

अनेक सेलिब्रिटींना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आपल्यावरील टीकेबद्दल बरेचसे कलाकार खुलेपणाने सांगतातही. नुकतंच मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिने आपल्याला सोशल मीडियावर आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं. “तू बुधवार पेठेतील ** आहेस” अशी शिवराळ कमेंट इन्स्टाग्राम युझरने तिच्या फोटोवर केली होती. त्याला मानसी नाईकने सडेतोड उत्तर दिलं.

मानसीच्या इन्स्टाग्राम फोटोवर ग लि च्छ कमेंट – मानसी नाईकने नुकतंच एका इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये आपल्याला आलेल्या ग लि च्छ अनुभवाबद्दल सांगितलं. एका युझरने मानसीच्या पोस्टवर “तू बुधवार पेठेतील ** आहेस” अशी कमेंट केली होती. “मला हसूही आलं आणि वाईटही वाटलं, की त्याने हे लिहिताना दोनदा विचारही नाही केला.” असं मानसी म्हणाली.

‘बुधवार पेठेतील मी आहे हे समजायला, तुम्ही मला बुधवार पेठेत कधी बघितलं? आणि तुम्ही तिथे काय करत होतात? दुसरी गोष्ट, बुधवार पेठ ही जागा ज्या स्त्रिया चालवतात, तुम्हाला काय वाटतं, त्या तिथे का आहेत? त्या स्वतःचं पोट भरण्यासाठी ते काम करतात. त्यांना स्वतःचं अस्तित्व आहे. त्या मेहनत करतात, हा विचार न करतात ती एक शि वी म्हणून अभिनेत्रीला वापरता’ असे म्हणत मानसीने त्याला झापलं.

मानसी नाईक काही महिन्यांपूर्वीच बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत विवाहबंधनात अडकली. त्यावेळीही तिला लग्नावरुन अनेकांनी ट्रोल केलं होतं. तुला मराठी मुलगा मिळाला नाही का? असा प्रश्न विचारुन तिला बेजार करण्यात आलं होतं.

Team Hou De Viral