“द फॅमिली मॅन”मधल्या अभिनेत्याची झालीत दोन लग्न,दुसरी पत्नी अभिनेत्रींना मागे टाकेल इतकी सुंदर आहे,पहा फोटोज!!!

“द फॅमिली मॅन”मधल्या अभिनेत्याची झालीत दोन लग्न,दुसरी पत्नी अभिनेत्रींना मागे टाकेल इतकी सुंदर आहे,पहा फोटोज!!!

१९९८ मध्ये प्रदर्शित राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ने मनोज वाजपेयी या नावाला नवी ओळख दिली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यानंतर मनोजने कधीच मागे वळून पाहिले नाही.

मनोजची फॅमिली मॅन 2 ही वेबसिरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असून या वेबसिरिजला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. मनोज वाजपेयीची पहिली पत्नी इंडस्ट्रीशी निगडित नव्हती. काहीच महिन्याच्या संसारानंतर त्यांनी वेगळे व्हायचे ठरवले.

त्याची दुसरी पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री नेहा असून तिने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. नेहाने ‘करीब’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर होगी प्यार की जीत, फिजा, राहुल, आत्मा अशा चित्रपटात ती दिसली. पण तिला जम बसवता आला नाही.

‘करीब’ची ही हिरोईन गेल्या अनेक वर्षांत इतकी बदललीय की, तिला ओळखणे कठीण व्हावे. नेहाचे खरे नाव शबाना रजा आहे. तिने तिचे नाव का बदलले, यामागेही कारण आहे. होय, नेहा चित्रपटसृष्टीत आली, तेव्हा तिला तिचे नाव बदलण्याची मुळीच इच्छा नव्हती.

एका मुलाखतीत तिने याचा खुलासा केला होता. माझ्या आईवडिलांनी मोठ्या प्रेमाने माझे शबाना नाव ठेवले होते. पण चित्रपटात आल्यानंतर नाव बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला आणि मला माझे नाव बदलावे लागले, असे तिने सांगितले होते.

लग्नापूर्वी सुमारे सात वर्षे नेहा व मनोज रिलेशनशिपमध्ये होते. नेहा आणि मनोजला एक मुलगी आहे तिचं नाव नैला आहे. बॉलिवूडला रामराम केल्यानंतर नेहा अनेकवेळा सिनेमांच्या स्पेशल स्क्रिनिंगला पती मनोजसोबत दिसते.

Team Hou De Viral