अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेक अप! अभिनेत्रीला धक्का, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेक अप!  अभिनेत्रीला धक्का, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बॉलिवूडमधील क्युट कपल्सपैकी एक आहेत. दोघेही अनेकदा सिनेमा आणि डिनरला जाताना दिसतात. अलीकडेच करिश्मा कपूरच्या ख्रिसमस पार्टीतही दोघे एकत्र दिसले होते. अर्जुन मलायकाचा खूप प्रोटेक्टिव आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात.

आता अर्जुन आणि मलायकाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे.मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर वेगळे झाले आहेत. दोघांचे ब्रेक अप झाले आहे. बॉलिवूडलाइफच्या ताज्या रिपोर्टनुसार, अर्जुन आणि मलायका यांनी आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

मलायका अरोराला तिचे घर सोडून सहा दिवसांपेक्षा जास्त काळ झाला आहे. ती पूर्ण आयसोलेशनमध्ये गेली आहे. अर्जुनसोबतच्या ब्रेक अप नंतर मलायका खूप दु:खी आहे आणि तिने स्वत:ला सावरण्यासाठी काही काळ जगापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

अर्जुन कपूरने या दिवसांत एकदाही तिची भेट घेतली नाही. खरे तर अर्जुन तीन दिवसांपूर्वीच बहीण रिया कपूरच्या घरी डिनरसाठी स्पॉट झाला होता. रियाचे घर मलायकाच्या घराच्या अगदी जवळ आहे. आणि असे असूनही. जेवल्यानंतर तो तिला भेटायला गेला नाही. मलायका सहसा अर्जुनसोबत या फॅमिली डिनरमध्ये सहभागी होते, पण यावेळी ती त्याच्यासोबत दिसली नाही.

त्यानंतर दोघांच्या ब्रेक अप च्या बातम्यांना अधिकच जोर आला आणि ती सोशल मीडियावर आ गी सारखी पसरली.गेल्या वर्षी १ जानेवारीला मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबतचे नाते इंस्टाग्रामवर सर्वांसमोर अधिकृत केले होते. मलायकाने एक प्रेमळ पोस्ट लिहिली, “ही एक नवीन पहाट आहे, हा एक नवीन दिवस आहे, हे एक नवीन वर्ष आहे….. 2021. #eternallygrateful.

Team Hou De Viral