एक ब्लॉऊजच्या डिजाईनमुळे महेशजींना मागावी लागली माफी ‘सुख म्हणजे नक्की काय असत’साठी,पहा व्हिडिओ!!!

एक ब्लॉऊजच्या डिजाईनमुळे     महेशजींना मागावी लागली माफी ‘सुख म्हणजे नक्की काय असत’साठी,पहा व्हिडिओ!!!

प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेली छोट्या पडद्यावरील मालिका ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मालिकेने अनेकदा टीआरपी यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मालिकेतील प्रत्येक कलाकाराला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद लाभतो आहे. परंतु, सध्या मालिका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मालिकेतील एका दृश्यात झालेल्या चुकीमुळे मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली आहे.

मालिकेत १४ सप्टेंबर रोजी दाखवण्यात आलेल्या एका दृश्यामुळे मोठा वा द निर्माण झाला आहे. मालिकेत दाखवण्यात आलेल्या सँडी या व्यक्तिरेखेच्या ब्लॉउजवर तथागत गौतम बुद्धांचं चित्र छापण्यात आलं होतं. त्यामुळे विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या असून मालिकेच्या निर्मात्यांवर ठाणे येथे गु न्हा दाखल करण्यात आला.

आता महेश यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी सगळ्यांची माफी मातीतली आहे. व्हिडिओत महेश म्हणाले, ‘ही चूक जाणीवपूर्वक केली गेली नाही याची मी खात्री देतो. मालिकेतील कलाकार आणि वेशभूषा करणारे सगळ्यांना गौतम बुद्धांबद्दल आदर आहे.

तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला माफ कराल अशी आशा. अशी चूक पुन्हा घडणार नाही याची मी खात्री देतो.’मालिकेतील त्या दृश्यामुळे सोशल मीडियावर वातावरण चांगलंच ता प लं आहे. ठिकठिकाणी मालिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु, महेश यांनी शेअर केलेल्या माफीच्या व्हिडीओमुळे वा द शांत होण्याची शक्यता आहे.

Team Hou De Viral