रिकाम्यापोटी लसूण खाल्ल्यानं पोट साफ होण्यासह; ‘या’ गंभीर आजारांपासून होतो बचाव

रिकाम्यापोटी लसूण खाल्ल्यानं पोट साफ होण्यासह; ‘या’ गंभीर आजारांपासून होतो बचाव

लसूण खाण्याचे बरेच फायदे आहेत. आयुर्वेदात लसूणाला औषधी मानले गेले आहे. असे म्हणतात की कोणत्या न कोणत्या स्वरूपात का होईना आपल्या आहारात लसूणचा समावेश असणे आवश्यक आहे. परंतु सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाणे खूप फायदेशीर आहे. चला त्या फायद्याविषयी जाणून घेऊया.

1) हाय बीपीपासून मुक्त व्हा – लसूण खाल्ल्याने हाय बीपीपासून आराम मिळतो. वास्तविक, लसूण रक्त परिसंचरण नियंत्रित करण्यात खूप उपयुक्त आहे. हाय बीपीच्या समस्येने ग्रस्त लोकांना दररोज लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.

2) पोटसंबंधीत आजार – अतिसार आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटाशी संबंधित आजार रोखण्यासाठी लसूण खूप उपयुक्त आहे. पाणी उकळवा आणि त्यात लसणाच्या कळ्या घाला. आणि हे पाणी उपाशी पोटी प्यायल्याने अतिसार आणि बद्धकोष्ठतापासून मुक्तता मिळते.

3) हृदय निरोगी राहील – लसूण हृदयाशी संबंधित समस्या देखील दूर करते. जे लोक सकाळी लसूणाचे सेवन करतात त्यांची पचनक्रिया नेहमी व्यवस्थित राहते. यामुळे पोटाचे विकार देखील कमी होतात. वजन कमी करण्यासाठीही लसणाचं सेवन फायदेशी ठरतं. रक्त गोठण्याची समस्या अनेकांना उद्भवते. लसूण खाल्ल्यानं रक्त पातळ होण्यास मदत होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

4) हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर – आपली हाड मजबूत राहावीत, यासाठी दररोज कच्चे लसूण खायला पाहिजेत. यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शिअमचा पुरवठा होतो. ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिससारखे गंभीर आजारांचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त लसणात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. दातदुखीचा त्रास असेल लसणाचे सेवन फायदेशीर ठरते. दातांमध्ये दुखणे सुरु झाल्यास लसणीचा तुकडा गरम करुन दुखत असलेल्या दाताखाली ठेवा.

5) रोगप्रतिकारकशक्ती वाढते – लसूणात अ‍ॅलिसिन नावाचं कम्पाउंड असतं. यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या कमी होते. याचे योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास रोग प्रतिकारक क्षमता देखील वाढते. रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असल्यास गंभीर आजारांपासून लांब राहता येतं

6) पचन चांगले होईल – रिकाम्या पोटी लसणाच्या कळ्या चघळण्याने तुमची पचनक्रिया चांगली राहते आणि भूकही खुलते.

5) सर्दी आणि खोकलापासून आराम – सर्दी, खोकला, दमा, न्यूमोनिया, ब्राँकायटिसच्या उपचारांमध्ये लसूण खाणे फायदेशीर ठरते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Aniket Ghate