नवरा व्हेंटिलेटरवर आहे पण बायकोला मात्र आई व्हायची घाई,पहा काय आहे नक्की प्रकार तुम्हाला पण धक्का बसेल!!!

नवरा व्हेंटिलेटरवर आहे पण बायकोला मात्र आई व्हायची घाई,पहा काय आहे नक्की प्रकार तुम्हाला पण धक्का बसेल!!!

वडोदऱ्यातील एका 32 वर्षीय तरूणावर खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरू आहेत. या युवकाची प्रकृती चिंताजनक आहे, अशा परिस्थितीत त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली.त्यामुळे या तरुणाच्या बायकोला मुलं हवं आहे, म्हणून तिने तिच्या नवऱ्याच्या शु क्रा णूं ना रुग्णालयात सुरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांच्या मदतीने ती आई होऊ शकेल.

नक्की काय आहे हे प्रकरण?

वडोदरा येथे राहणार्‍या या युवकाचे फक्त 8 महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. परंतु मधल्या काळात त्याला कोरोनाची लागण झाली ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याची प्रकृती दिवसें दिवस ख रा ब होत चालली आहे.

आता त्याच्या शरीराचे अनेक भाग काम करणे बंद झाले आहे. त्याची स्थिती नंतर इतकी खालावली की, त्यांने आता डॉक्टरांच्या उपचाराला उत्तर देणे थांबवले आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या कुटूंबीयांना सांगितले की, हा रुग्ण 24 तासांपेक्षा जास्त काळ जगू शकणार नाही.

ही परिस्थिती लक्षात घेता, रुग्णाच्या बायकोने नवऱ्याच्या प्रेमाची शेवटची निशाणी म्हणून माझ्याकडे माझ्या नवऱ्याचे मुल असावे अशी इच्छा व्यक्त केली आणि आपण आई होण्याचे ठरविले.त्यामुळे या महिलेसह इतर नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला रुग्णाचे शु क्रा णू काढून त्यांना सुरक्षित ठेवण्याची विनंती केली.

परंतु, रुग्णाच्या किंवा त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय रुग्णालय प्रशासन तसे करु शकत नसल्याचे सांगितले आणि त्यांना नकार दिला.रुग्णालय प्रशासनाने नकार दिल्यावर महिलेने आपले वकील निलय पटेल यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली. परिस्थिती लक्षात घेता वकिलांनी तातडीने या प्रकरणाची सुनावणी करण्याचे आवाहन केले, जे उच्च न्यायालयाने देखील मान्य केले.

याचिकेत असे म्हटले आहे की, रुग्णाची प्रकृती सतत खालावत आहे आणि त्याच्या बायकोला त्याच्या मुलाची आई व्हायचे आहे परंतु, ती व्यक्ती परवानगी देण्याच्या स्थितीत नाही. अशा परिस्थितीत, अपील करण्यात आले होते की, आयव्हीएफ / एआरटी तंत्रज्ञानाद्वारे रुग्णाचे शु क्रा णू सुरक्षित करण्यासाठी उच्च न्यायालयाने रुग्णालयाला निर्देश दिले आहे.

उच्च न्यायालयानेही परिस्थिती लक्षात घेता याला मान्यता दिली आहे. हायकोर्टाने म्हटले आहे की, शुक्राणूला काळजीपूर्वक रुग्णाच्या शरीरापासून सुरक्षित ठेवले पाहिजे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रुग्णालयाच्या प्रशासनानेही रुग्णाच्या शरीरातून शुक्राणू काढून त्यांना सुरक्षित ठेवले आहे, जेणेकरुन रुग्णाची पत्नी आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे आता आई होऊ शकेल.

Team Hou De Viral