आपल्या घरासाठी कुटुंबासाठी सोपे तोडगे एकदा नक्की करा : सुखकारक प्रगती होत राहील!

आपल्या घरासाठी कुटुंबासाठी सोपे तोडगे एकदा नक्की करा : सुखकारक प्रगती होत राहील!

मित्रांनो आपल्या घरासाठी आपल्या घरातील सदस्य साठी कुटुंबासाठी हे सोपे तोडगे एकदा नक्की करा महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर राहील. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जेवण जास्त जेवतो, निष्ठुरपणे बोलतो, सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी जो झोपतो, अशा आळशी लोकांना लक्ष्मीमाता सोडून जाते.

\अशा पद्धतीने वागणारे साक्षात विष्णू असले तरी त्यांना लक्ष्मी माता सोडून जाते. जी व्यक्ती सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते त्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभते, उत्तम आरोग्य लाभते. ऐश्वर्य व त्याची प्राप्ती त्याला होते कामानिमित्ताने बाहेर पडत असताना एखादी तुळशी पत्र पैशाच्या अभावामुळे तटलेली सर्व कामे मार्गे लागतील.

घरामध्ये दुकानांमध्ये ऑफिसमध्ये जर मुरली वाजवणाऱ्या कृष्णाची मूर्ती किंवा फोटो पूर्वेकडील भिंतीवर लावावा. कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही. घरामध्ये झाडू मारत असताना तो झाडू सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर मारावा. घरामध्ये गरिबी दारिद्रता येत नाही.

वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीचे कुलदेवतांचे दर्शन घ्यावे. दरवर्षी अभिषेक व पूजा न चुकता करावी. म्हणजे आपल्याकडे पैशाचा ओघ वाढेल कुलदेवी व कुलदेवतांचे आशीर्वाद असल्यामुळे आपल्या कुळाचे रक्षण होईल. आणि आपल्याकडे भरपूर धनधान्य, समृद्धी, पैसा आडका सर्वकाही येईल.

ज्या वेळी आपण आपल्या घरामध्ये नवीन झाडू किंवा त्यावेळी तिची पूजा करावी. पूजा करत असताना तिला हळदी कुंकू लावून तिची पूजा करावी. आपल्या त्या झाडूला पाय लागेल अशा ठिकाणी तो झाडू ठेवू नये. आणि सहजासहजी तो झाडू किंवा केरसुणी कुणाच्याही नजरेस येणार नाही.

अशा ठिकाणी ठेवावी घरांमध्ये दिवे लागल्यानंतर झाडू कधीही मारू नये. घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा. तो दररोज कापडाने पुसून काढावा. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवावा. सध्या आपारमेंट मध्ये राहत असल्यामुळे जास्त वेळ दरवाजा उघडे ठेवणे जमत नाही.

अशांनी किमान तिन्ही सांजेच्या वेळी थोड्या वेळासाठी दरवाजा उघडा सोडावा. संध्याकाळच्या वेळी घरामध्ये धूप घालावा. सकाळी स्वयंपाक करते वेळी एक भाकरी गाईला, एक कुत्र्याला, आणि एक छतावर पक्षांसाठी दररोज ठेवावी. यामुळे पितृदोष नाहीसा होतो. पितृदोषामुळे होणारा त्रास कमी होतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे वास्तुदोष सांगून घराची तोडफोड करणे याला शास्त्र सहमत नाही. जर आपण घराची तोडफोड केली तर आपल्याला वास्तुभंगाचा दोष लाभतो. घरामध्ये काटेरी रोप किंवा कॅक्टस लावल्यामुळे त्या घरातील व्यक्तींच्या वाद विवाद होतात. मत भिन्नता निर्माण होते. त्यामुळे अशी काटेरी रोप घरामध्ये लावणे टाळावे.

ज्यावेळी आपला पगार होतो. किंवा इतर कोणी आपल्याला पैसे देणार असतात, म्हणजेच काय तर रोख रक्कम आपल्या हातामध्ये पडल्यानंतर इतरत्र ती खर्च न करता आपल्या घराकडे घेऊन यावी. तो पैसा घरात आल्यानंतर तो देवार्यामध्ये ठेवावा त्याला हळदीकुंकू लावून पूजा करावी.

व ज्या ठिकाणी आपण इतर मौल्यवान वस्तू पैसे ठेवतो, त्या ठिकाणी ते पैसे ठेवावेत. आणि दुसऱ्या दिवसापासून ते पैसे खर्च करण्यास हरकत नाही. मात्र रोख रक्कम आपल्या हातामध्ये पडल्याबरोबर ती कोणत्याही परिस्थितीमध्ये खर्च करायची नाही. जर आपण अशा पद्धतीने पैशांची पूजा करूनच दुसऱ्या दिवसापासून जर ते पैसे खर्च करायला सुरुवात केली, तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर राहील. आपल्या घरामध्ये बरकत, धनसंपदा राहील.

मित्रांनो हे काही सोपे उपाय आहेत. ते आपण केल्याने हे साधे आणि सोपे उपाय तोडगे आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब करण्यास सुरुवात केला सुख समृद्धी आणि सौभाग्य आणि आपल्याला मनःशांती लाभेल. हे उपाय अनेक जणांनी करून याचा लाभ करून घेतला आहे. तुम्ही देखील हे उपाय करून याचा लाभ घेऊ शकता. हे उपाय साधे आणि सोपे आहेत.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका

Sayali Ghate