…म्हणून कुत्र्यांची शेपूट लोक कापतात, जाणून घ्या त्यामागचे धक्कादायक कारण !

…म्हणून कुत्र्यांची शेपूट लोक कापतात, जाणून घ्या त्यामागचे धक्कादायक कारण !

आपल्या सर्वानाच माहिती आहे की कुत्र्याला सर्वात जास्त निष्ठावंत प्राणी मानले जाते, परंतु कुत्र्यांशी संबंधित बर्‍याच गोष्टी आपल्याला ह्या माहिती नसतात, जसे कुत्र्यांची शेपटी का कापली जाते, हे ऐकून थोड भीतीदायक वाटत. परंतु तुम्ही पुष्कळ कुत्री पाहिली असतील ज्यांची शेपूट कापलेली असते. परंतु ती कापली जाते ? चला तर मित्रानो जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर त्या बद्दल आपण जाणून घेऊया…

शेपटी हि कुत्र्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत कारण ते इतर कुत्र्यांशी संवाद साधण्याबरोबर तसेच माणसांशी भावना व्यक्त करण्यासाठी याचा वापर करतात. जर शेपूटच नसेल तर आपली भावना व्यक्त करण्यास सक्षम नसतील. तसेच कुत्री त्यांच्या शेपटीचा उपयोग पळतांना संतुलन राखण्यासाठी करतात. तसेच पोहण्यासाठी देखील करतात.

कुत्र्यांची शेपूट कापली जाते आणि कोणत्याही प्राण्याचे शेपूट कापण्याच्या प्रक्रियेस ‘डॉकिंग’ असे म्हणतात, याशिवाय कुत्र्यांचे कान देखील कापले जातात आणि त्यांना ‘क्रॉपिंग’ असे म्हणतात.

कुत्रींच्या शेपटी कापण्यामागे अनेक कारणे सांगितली गेली आहेत जसे की कुत्र्यांची शेपटी कापल्याने त्यांचा कणा हा बळकट होतो, तसेच वेग वाढवण्यासाठी आणि इजा टाळण्यासाठी कापली जाते. परंतु आधुनिक काळात त्यांना सुंदर बनविण्यासाठी असे केले जात आहे.

संरक्षक (गार्ड) कुत्र्यांच्या बाबतीतही, कारण हल्लेखोर त्यांची शेपूट पकडून ती खेचू शकतो आणि त्यांना हानी पोहोचवू शकतो. प्राचीन रोममध्ये, कुत्र्यांचे शेपूट कापले जात होते आणि त्याकाळी असे केले जायचे कारण त्यावेळी लोकांचा असा विचार होता की शेपूट कापल्याने रेबीज होण्याचा धोका कमी होतो.

तथापि, आता शास्त्रज्ञांनी हे स्पष्ट केले आहे की कुत्र्यांच्या शेपटीशी रेबीजचा काही संबंध नाही. याव्यतिरिक्त, शिकारी कुत्र्यांची शेपटी त्यांना इजा होण्यापासून वाचवण्यासाठी कापली जाते, कारण धावताना शेपूट हालत असते त्यामुळे त्याला दुखापत होऊ शकते.

परंतु बर्‍याच देशांनी ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, फिनलँड, यांनी श्वानांची शेपूट कापण्याबाबत कडक कायदे केले आहेत, कुत्र्याचे शेपूट तोडणे आता बेकायदेशीर आहे, पण दुर्दैवाने भारतात याला कोणतेही बंधन नाही. तर मित्रांनो, कुत्र्याच्या शेपूट कापण्यामागील कारणांबद्दल आपल्याला आता अधिक चांगले ज्ञान आले असेलच. आशा आहे की या लेखाच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेलच.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate