झाला मोठा खुलासा क्रिश 4 मध्ये ऋतिक सोबत झळकणार ही अभिनेत्री

झाला मोठा खुलासा क्रिश 4 मध्ये ऋतिक सोबत झळकणार ही अभिनेत्री

सुरुवातीला कृती सेनॉनचंच नाव फायलन करण्यात आलं होतं.पण तिच्या हातामध्ये सध्या अनेक चित्रपट आहेत त्यामुळे तिला क्रिश 4 च्या शूटिंगसाठी तारखा देणं शक्य झालं नाही. त्यामुळे दुसऱ्या अभिनेत्रीचा विचार सुरू झाला. आता या भूमिकेसाठी कियारा अडवणीचं नाव निश्चित करण्यात आलं.

क्रिश’ चित्रपट आणि त्याचे सिक्वेल लहान मुलांपासून अगदी मोठ्या माणसांनाही आवडले. क्रिश 3 नंतर क्रिश 4 (Krrish 4) चीही घोषणा झाली. त्यामुळे हृतिकला पुन्हा (Hritik Roshan) क्रिशच्या रुपात पाहायला मिळणार असल्याने त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत. पण आता क्रिश 4 मध्ये हृतिक रोषनसोबत नक्की कोणती अभिनेत्री झळकणार याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि कृती सेनॉनचं (Kriti Sanon) नाव यामध्ये आघाडीवर होतं. अखेर राकेश रोषन यांनीच क्रिश 4च्या अभिनेत्रीची घोषणा केली आहे. कियारा अडवाणी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे

कियारा अडवणी आणि हृतिक रोषन यांची जोडी ऑनस्क्रीन एकदम फ्रेश दिसेल असा निर्मात्यांचा अंदाज आहे. कियाराचा कबीर सिंह हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्यानंतर लक्ष्मी चित्रपटातही तिने काम केलं होतं. काही दिवसांनी ती इंदू की जवानी या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

कियारा सध्या भूलभूलय्या 2च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमामध्ये ती कार्तिक आर्यनसोबत झळकणार आहे. अक्षय कुमारचा मुळ सिनेमा अतिशय गाजला होता. आता भूलभुलय्या 2 प्रेक्षकांच्या मनावर जादू करतो का ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Editor