सावधान ! कोरफडचे अतिसेवन ठरू शकते घातक, या लोकांनी तर कोरफडचे सेवन टाळावे

सावधान ! कोरफडचे अतिसेवन ठरू शकते घातक, या लोकांनी तर कोरफडचे सेवन टाळावे

कोरफड आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते, परंतु कोरफडीचे जास्त प्रमाणात वापर आरोग्यासाठी हानिकारक आहे. कोरफडचा वापर मर्यादित प्रमाणात करावा. कोरफडचा जास्त प्रमाणात वापर केल्यास बर्‍याच प्रकारच्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कोरफडच्या अत्यधिक वापराचे तोटे सांगणार आहोत. कोरफडचा वापर मर्यादित प्रमाणात करणे अत्यंत फायदेशीर असते. कोरफड अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे, परंतु तरी देखील याचा वापर मर्यादित प्रमाणात केला पाहिजे. चला तर मंग जाणून घेऊया कोरफडचे अधिक वापराचे नुकसान …

पोटाची समस्या होऊ शकते – कोरफडचा जास्त वापर आरोग्यासाठी हानिकारक आहे. कोरफडचा जास्त प्रमाणात वापर केल्याने पोटाची समस्या उद्भवू शकते. कोरफडचा जास्त प्रमाणात वापर केल्याने शरीरातील पोटॅशियम पातळी देखील खराब होते.

त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकते – कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, परंतु कोरफडचा जास्त वापर केल्यास त्वचेची समस्या उद्भवू शकते. कोरफडचा जास्त प्रमाणात वापर केल्याने तुम्हाला विविध समस्या उद्भवू शकतात. जसे की कोरफड जेलचा जास्त वापर केल्याने त्वचेवर पुरळ, खाज सुटणे आणि लालसरपणा येऊ शकतो.

इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजेच IBS – इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजेच आयबीएस म्हणजे आतड्यांच्या अनियमित हालचाली/मलत्याग. कोरफड रस जास्त प्रमाणात सेवन केल्याने इरिटेबल बॉवेल सिंड्रोम अर्थात IBS ची समस्या होऊ शकते. ज्या लोकांना इरिटेबल बोवेल सिंड्रोम आहे म्हणजेच आयबीएस किंवा पचनसंबंधित समस्या आहेत त्यांनी कोरफड रस पिणे टाळले पाहिजे. या व्यतिरिक्त कोरफड रस जास्त सेवन केल्याने पोटदुखी, अतिसार आणि लूज मोशनची समस्या देखील उद्भवू शकते.

गर्भवती महिलांसाठी हानिकारक – गर्भवती महिलांनी कोरफड रस वापरणे टाळावे. कोरफड मध्ये लेकटर प्रॉपर्टी आढळते जी गर्भवती महिलांसाठी हानिकारक असू शकते. कोरफड रस घेतल्यास गर्भवती महिलांचे गर्भाशय संकुचित होऊ शकते.

डिहायड्रेशनची समस्या – कोरफड रसचे अतिसेवन केल्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. बरेच लोक निरोगी राहण्यासाठी सकाळी कोरफड रस घेतात, परंतु याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्यास हानी पोहचू शकते.

मधुमेहाच्या रुग्णासाठी हानिकारक ठरू शकते – कोरफडचा रस मधुमेहाच्या रुग्णांना हानिकारक ठरू शकतो. मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कोरफडचा रस घ्यावा.

यकृत संबंधित समस्या उद्भवू शकतात – कोरफडचा जास्त प्रमाणात वापर केल्यास यकृत संबंधित समस्या उद्भवू शकतात. यकृतबाबत रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोरफड रस घेऊ नये. यकृत निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, कोरफड रस मर्यादित प्रमाणात घ्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.Com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Aniket Ghate