कोणत्याही शनिवारी देवघरामध्ये ठेवा एक कासव : घरातून वाईट शक्ती निघून जाईल, घरात भरभराट होईल!

कोणत्याही शनिवारी देवघरामध्ये ठेवा एक कासव : घरातून वाईट शक्ती निघून जाईल, घरात भरभराट होईल!

मित्रांनो आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असेल वाईट शक्तीचा प्रभाव असेल, किंवा आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी असेल, मुलांच्या शिक्षणामध्ये बाधा येत असेल, तसेच नोकरीमध्ये काही अडचणी असतील, सतत घरामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणी येत असतील ,सतत आपल्या सोबत नकारात्मक घडत असेल अशावेळी आपल्याला सतत असे वाटत असते. की अशी वाईट वेळ आपल्यावरच का येते.

आपण एवढी सेवा करतो देवदो करतो, आणि उपाय करतो, तरी पण अशा अडचणी आपल्याच वाटेला का येतात. असे आपल्याला वाटते एवढे आपण मरमर मारतो, खूप मेहनत करतो, मात्र आपल्याला आपल्या मेहनतीचे फळ का मिळत नाही. याचे एकच प्रमुख कारण असते.

ते म्हणजे आपल्या घरामध्ये असणारी वाईट शक्ती, तसेच नकारात्मक ऊर्जा. आपल्या घरामध्ये असे तर वरील सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी आपल्या सोबत घडत असतात. या नकारात्मक ऊर्जेमुळे आणि शक्तीमुळे आपल्या घरामध्ये सर्वकाही नकारात्मक होत असते. सकारात्मक कोणत्याही गोष्टी घडत नाहीत.

म्हणूनच आपल्या घरामध्ये सुख, समाधान समृद्धी आणि बरकत राहत नाही. यासाठी मित्रांनो आपण बरेच उपाय करू शकतो. नकारात्मक ऊर्जेपासून आपली सुटका करून घेण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय दिलेले आहे. तर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये देखील या नकारात्मक ऊर्जेपासून सुटका करून घेण्यासाठी बरेच उपाय सांगितलेले आहेत.

असाच एक शनिवारच्या दिवशी करायचा उपाय त्याची माहिती आपण या लेखामध्ये घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कासव लागणार आहे. हा कासव आपण आपल्या देव घरामध्ये ठेवणार आहोत. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी कासव आपल्या देवघरामध्ये ठेवलेला असेल.

पण हा कासव आपण आपल्या देवघरामध्ये ठेवत असताना कोणत्या पद्धतीने तो कासव ठेवला आहे. आणि कासव ठेवलेली आपली दिशा योग्य आहे. काय हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. ज्यांच्याकडे कासव आहे त्यांनी नवीन कासव आणायचा नाही. पण ज्यांच्याकडे कासव नाही, त्या व्यक्तीने हा कासव चांदीचा, तांब्याचा, पितळेचा किंवा काचेचा आणला तरी चालतो.

त्या कासवा सोबत आपल्याला एक प्लेट लागणार आहे. आपल्याला हक्क शनिवारच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे. शनिवारी सकाळ पासून बारा वाजण्याआधी आपल्याला हा कासव आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे.देवघरामध्ये कासवाची स्थापना करण्याआधी त्या कासवाला दुधाने आणि पाण्याने अभिषेक घालायचा आहे.

आणि आपण आपल्या देवघरामध्ये ज्या साईटला तोंड करून बसतो त्या उजव्या हाताला आपल्याला या कासवाची स्थापना करून ठेवायचे आहे. देवघरामध्ये कासव ठेवत असताना त्याचे तोंड पूर्व दिशेला असणार आहे. अशा पद्धतीने तो कासव आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे.

आपल्या हाताच्या उजव्या बाजूला आणि पूर्व दिशेला त्या कासवाचे तोंड असायला हवे. अशा पद्धतीने तो कासव आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे. ज्यावेळी आपण कासव देवघरामध्ये ठेवणार आहोत. कासव ठेवण्याच्या प्लेटमध्ये आपल्याला पाणी घालून ठेवायचे आहे.

बरेच जण त्या प्लेटमध्ये तांदूळ घालून तो कासव ठेवतात. मात्र त्या प्लेटमध्ये तांदूळ न घालता पाणीच घालायचे आहे. प्लेटमध्ये पाणी घालून तो कासव त्याचे तोंड पूर्व दिशेला असणार आहे .आणि देवपूजा करत असताना आपल्या उजव्या बाजूस तो कासव असावा.

अशा पद्धतीने जर कासवाची स्थापना आपण आपल्या घरांमध्ये केली तर नक्कीच आपल्या घरांमधील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल. कासव घेत असताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. ते म्हणजे शक्यतो तो कासव कोणत्यातरी धातूचा असावा.

आणि जर आपल्याला हा धातूचा कासव घेणे शक्य नसेल तर त्यांनी हा काचेचा कासव घेतला तरी चालतो. शक्यतो असा प्रयत्न करावा. की कोणत्या ना कोणत्या धातूचा कासव आपल्याला जायचं आहे. जसे की आपल्या देवघरामध्ये देवाच्या मुर्त्या ह्या पितळेचे चांदीच्या तांब्याच्या असतात अशा धातूंमधला कासव आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळतो.

शक्यतो कोणत्या ना कोणत्या धातूचाच कासव आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्याची स्थापना वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या देवघरामध्ये करायचे आहे यामुळे नक्कीच आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती निघून जाईल. आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल. हा उपाय बऱ्याच जणांनी करून याचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Sayali Ghate