तुम्ही स्वयंपाकघरात ‘ही’ चूक करता? पाहा काय होतील परिणाम

तुम्ही स्वयंपाकघरात ‘ही’ चूक करता? पाहा काय होतील परिणाम

स्वयंपाक घरच नाही तर स्वयंपाक घरातील वस्तूंना जर आपण योग्य पद्धतीनं ठेवलं नाही किंवा त्या वस्तूंची खरेदी योग्यवेळी केली नाही, तर वास्तू दोष होऊ शकतो. यापैकीच स्वयंपाक घरातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोळपाट-लाटणं. जर पोळपाट-लाटणं योग्यपद्धतीनं वापरलं ठेवलं नाही तर त्यामुळे आपल्या घरावर संकट येऊ शकतं.

पोळपाट-लाटणं घरात सुख-समृद्धी आणणारं असतं आणि ते योग्यपद्धतीनं वापरलं-ठेवलं नाही तर संपत्तीची हानी आणि घरात दु:ख येऊ शकतं. वास्तुशास्त्रामध्ये पोळपाट-लाटणं खरेदी करण्यासाठीही योग्य दिवस सांगितला गेलाय. तर मग जाणून घ्या पोळपाट-लाटणं कशाप्रकारे आपल्या आयुष्यावर परिणाम करतं.

जाणून घ्या पोळपाट-लाटण्याबद्दल काय म्हणतं वास्तुशास्त्र

पोळपाट-लाटणं स्वच्छ ठेवावं – आपण पोळपाट-लाटण्याचा जेव्हा पण वापर करत असला त्यानंतर ते स्वच्छ करून ठेवावं. पोळपाट-लाटणं कधी-कधीच स्वच्छ करणं वास्तुशास्त्रानुसार रोगाला आमंत्रण देणारं असतं आणि असं केल्यास वित्तहानी सुद्धा होते. म्हणून दररोज पोळपाट-लाटणं धुवून स्वच्छ करून ठेवावं. असं केल्यानं घर निरोगी राहतं.

पोळपाट-लाटण्याचा आवाज येऊ नये – पोळ्या करतांना जर पोळपाटाचा आवाज येत असेल तर वास्तुशास्त्रानुसार हा चांगला संकेत नसतो. पोळपाटाचा येणारा आवाज वित्तहानीचे संकेत देतो. त्यामुळे जर आपल्या पोळपाटाचा पोळी करतांना आवाज येत असेल तर ते ताबडतोब बदलून घ्यावं किंवा त्याखाली पेपर ठेवून पोळ्या लाटाव्यात. यामुळे मग वास्तु दोष होत नाही.

कधी विकत घ्यावं नवीन पोळपाट-लाटणं – वास्तुशास्त्रामध्ये पोळपाट-लाटणं विकत घेण्यासाठी सुद्धा चांगला काळ सांगितला गेलाय. कुठल्याही दिवशी पोळपाट-लाटणं विकत घेणं योग्य नाही. जर आपलं पोळपाट लोखंडाचं किंवा स्टीलचं असेल तर ते शनिवारी अजिबात विकत घेऊ नये. जर लाकडाचं पोळपाट विकत घ्यायचं असेल तर ते पंचक असेल तेव्हा किंवा मंगळवारी आणि शनिवारी विकत घेऊ नये. पोळपाट जेव्हा पण घ्यायचं असेल तर ते बुधवारी घ्यावं.

पोळपाट-लाटणं ठेवण्याची पद्धत – पोळपाट-लाटणं तर प्रत्येक घरी वापरलं जातं पण ते ठेवण्याची योग्य पद्धत माहिती नसते. त्यामुळे जाणून घ्या, पोळपाट-लाटणं ठेवण्यासाठी स्टँड विकत घ्यावं आणि त्यावरच ते ठेवावं. कणिकेच्या डब्यावर किंवा कुठल्याही भांड्यावर ते ठेवू नये. पोळपाट उभं ठेवावं आणि लाटणं नेहमी आडवं ठेवावं.

कोणतं पोळपाट-लाटणं असतं चांगलं, जाणून घ्या

वास्तुशास्त्रामध्ये कोणतं पोळपाट लाटणं वापरणं योग्य हे सुद्धा सांगितलं गेलंय. वास्तुशास्त्रामध्ये पोळपाट आणि लाटणं दोन्ही स्टीलचं असेल तर सर्वश्रेष्ठ मानलं गेलंय. तर लाकडाचं पोळपाट-लाटणं रोगट मानलं गेलंय. कारण यात बुरशी लागते, तसंच अधिक तेल सोकून घेत असल्यामुळे ते योग्य मानलं जात नाही. तर मग आता आपल्या घरात आनंद नांदावा असं वाटत असेल तर स्वयंपाक घरातील पोळपाट-लाटण्यावर विशेष लक्ष द्यावं, जेणेकरून घरात नेहमी सुख-समृद्धी राहील.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate