‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यांनी चित्रपटात साकारली होती ‘किन्नर’ ची भूमिका, यातले 2 आहेत प्रसिद्ध मराठी अभिनेते

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यांनी चित्रपटात साकारली होती ‘किन्नर’ ची भूमिका, यातले 2 आहेत प्रसिद्ध मराठी अभिनेते

बॉलिवूड चित्रपटांमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या खास अभिनय आणि व्यक्तिरेखेसाठी ओळखले जातात. काही कलाकारांनी चित्रपटातही उलट सुलट भूमिका केल्या आहेत. आणि त्यातले असे एक पात्र म्हणजे किन्नरचे आहे.

होय, बॉलिवूडमध्ये असे बरेच चित्रपट आहेत ज्यात किन्नरचे पात्र पाहिले गेले आहे आणि ज्या कलाकारांनी हे पात्र साकारले आहे त्यांनी आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवून चित्रपटाच्या पडद्यावर आपली खास छाप सोडलेली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच बॉलिवूड कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी चित्रपटांमध्ये किन्नरची भूमिका साकारली आहे.

आशुतोष राणा – प्रसिद्ध राजकारणी शबनम मौसी यांच्या जीवनातून प्रेरित झालेल्या चित्रपटात आशुतोषने किन्नर चा अभिनय केला होता. शबनम मौसी असे या चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटात किन्नरची भूमिका आशुतोष राणाने साकारली होती. शबनम मौसी ही पहिली किन्नर आहे ज्याने निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती. हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता.

महेश मांजरेकर – मांजरेकर हे एक मराठी आणि बॉलिवूड अभिनेते आहेत. महेश मांजरेकर यांचा वाढदिवस 16 ऑगस्ट रोजी असतो. 2013 मध्ये त्यांनी रज्जो या चित्रपटात किन्नरची भूमिका केली होती. रज्जो या चित्रपटामध्ये कंगना रनौत आणि पारस अरोरा मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी दाखवू शकला नाही.

सदाशिव अमरापूरकर – 1991 साली प्रसिद्ध झालेल्या महेश भट्ट यांचा सडक चित्रपटाचा सिक्वेल चर्चेत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात सदाशिव अमरापूरकर यांनी खलनायकाची भूमिका केली होती. किन्नरची व्यक्तिरेखा या चित्रपटातील अजूनही लोकांच्या लक्षात आहे. या चित्रपटासाठी सदाशिवने अमरापूरकर यांना सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. सदाशिव अमरापूरकर आता या जगात राहिलेले नाहीयेत.

परेश रावल – परेश रावल यांनी 1997 मध्ये ‘तमन्ना’ या चित्रपटात किन्नरची भूमिका साकारली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते. या चित्रपटात पूजा भट्ट, शरद कपूर आणि मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत होते. परेश रावलची किन्नरच्या भूमिकेतली भूमिका चांगलीच गाजली होती.

प्रशांत नारायणन – इमरान हाश्मी आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या ‘मर्डर 2’ चित्रपटात एक संस्मरणीय पात्र प्रशांत यांनी साकारले होते. या चित्रपटात प्रशांत नारायणन यांनी किन्नरची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या खलनायकाची भूमिकाही त्याने उत्तम प्रकारे पार पाडली होती. मर्डर 2 हा चित्रपट 2011 मध्ये आला होता.

रवी किशन – रवी किशन हा बॉलिवूड आणि भोजपुरी सिनेमामधील नामांकित कलाकारांपैकी एक आहे. रवी किशनने 2013 मध्ये किन्नरची भूमिका साकारून खूप चर्चेत आला होता. त्याने तिग्मांशू धुलिया ची फिल्म बुलेट राजामध्ये किन्नरचे पात्र केले होते. जी लोकांना चांगलीच आवडली होती. बुलेट राजा या चित्रपटामध्ये सैफ अली खान, सोनाक्षी सिन्हा आणि जिमी शेरगिल यांनीही काम केले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate