सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचं झालं ब्रेकअप? त्यांच्या नात्याबाबतचे समोर आलं धक्कादायक…

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचं झालं ब्रेकअप? त्यांच्या नात्याबाबतचे समोर आलं धक्कादायक…

बॉलिवूडमध्ये सध्या कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ब्रेकअपची चर्चा जोरदार रंगली आहे. कपलचं ब्रेकअप खरंच झालंय की, ही बातमी खोटी आहे यावर सस्पेन्स कायम आहे. पावर कपलच्या ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आली. जी त्यांच्या नात्याबाबत आहे.

जेव्हा कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरू झाली त्यांच्या फॅन्सना धक्का बसला. सगळ्यांनाच त्यांच्या नात्याबाबतचं सत्य जाणून घ्यायचं आहे. त्यांचं ब्रेकअप सहमतीने झालं की, त्याचा शेवट वाईट झाला याचा खुलासा आता झाला आहे.

बॉलिवूड लाइफने सूत्राच्या हवाल्याने वृत्त दिलं की, सिद्धार्थ आणि कियाराने सहमतीने ब्रेकअपचं निर्णय घेतला. त्यांचं ब्रेकअप वाईट नोटवर संपलं नाही. त्यांच्यात प्रेम शिल्लक राहिलं नसलं तरी ते चांगले मित्र राहतील. भविष्यात ते सोबत सिनेमात कामही करतील. कारण ते एकमेकांचा सन्मान करतात.

सूत्राने सांगितलं की, सिद्धार्थ आणि कियारा एकमकेांच्या कामाचा सन्मान करतात. अनेकदा दोघांनी हे स्पष्टही केलं आहे की, ते त्यांच्या कामावर किती प्रेम करतात. हेच कारण आहे की, सिद्धार्त कियारा अडवाणीचा आगामी सिनेमा भूल भुलैय्या २ ची वाट बघत आहेत. तेच अभिनेत्री सिद्धार्थची वेबसीरीज इंडियन पोलीस फोर्ससाठी वाट बघत आहे.

कियारा आणि सिद्धार्थ ‘शेरशाह’ सिनेमात एकत्र दिसले होते. या सिनेमातील दोघांची केमिस्ट्री खूपच पसंत केली गेली होती. दोघांचाही हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. दोघांनी कधीही त्यांचं रिलेशनशिप कन्फर्म केलं नाही. आणि आता त्यांच्या ब्रेकअपबाबत सस्पेन्स कायम आहे. आता येत्या काही दिवसात हे स्पष्ट होईल अशी आशा फॅन्सना आहे.

Aniket Ghate