‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींनी ‘हिरो’ च्या ऐवजी केले आहे ‘खतरनाक’ खलनायकांशीं विवाह, एक तर आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये बर्याच अश्या अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या चित्रपटाच्या नायकाशीच लग्न केले आहे. काही अभिनेत्रीने व्यवसायिकशी तर काहींनी क्रिकेटपटूशी लग्न करून आपल्या संसार सुरू केला आहे. परंतु आम्ही आज तुम्हाला अशा अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत ज्यांनी चित्रपटांत खतरनाक दिसणाऱ्या खलनायकाशी लग्न केले आहे. चला तर मंग जाणून घेऊया या अभिनेत्रींविषयी …
रेणुका शहाणे – ‘हम आपके हैं कौन’ या सिनेमात दिसलेली अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2001 मध्ये रेणुकाने शहाणे यांनी आशुतोष राणाशी लग्न केले. आशुतोष राणा ‘दुश्मन’, ‘संघर्ष’, ‘बादल’ यासारख्या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसलेले आहेत.
पूजा बत्रा – 90 च्या दशकातील एक सुंदर अभिनेत्री पूजा बत्राने चित्रपट सृष्टीतले प्रसिद्ध खलनायक नवाब शाह बरोबर काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न केले. नवाब शाहने ‘टायगर जिंदा है’, ‘डॉन 2’ आणि अनेक दक्षिण चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून काम केले आहे.
पोनी वर्मा – पोनी वर्मा एक चांगला नृत्यदिग्दर्शक आहे, तिने 2010 मध्ये प्रकाश राजसोबत लग्न केले. ‘सिंघम’, ‘वांटेड’, ‘दबंग 2’ यांसारख्या बऱ्याच बॉलिवूड आणि दक्षिणच्या चित्रपटांमध्ये प्रकाश राज यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे.
निवेदिता भट्टाचार्य – या प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉलिवूड अभिनेता केके मेननशी लग्न केले आहे, ज्यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांत खलनायक म्हणून काम केले आहे. बेबी या चित्रपटातील त्याची भूमिका प्रसिद्ध झाली होती.
कृतिका सेंगर – ‘राणी लक्ष्मीबाई’ आणि ‘कसम तेरे प्यार की’ सारख्या अनेक सुपरहिट सीरियलमध्ये काम केलेल्या टीव्ही अभिनेत्री कृतिका सेंगरने 2014 मध्ये दिग्दर्शक पंकज धीर यांचा मुलगा निकितन धीरशी लग्न केले होते. निकितन धीर हीच व्यक्ती आहे ज्यांनी ‘मिशन इस्ताम्बुल’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘दबंग 2’ आणि ‘रेडी’ या सारख्या बर्याच चित्रपटात खलनायकाची भूमिका केली आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.