खूप प्रयत्न करून देखील तुम्ही कर्जाची ‘परतफेड’ करू शकत नसाल, तर हे उपाय करा

खूप प्रयत्न करून देखील तुम्ही कर्जाची ‘परतफेड’ करू शकत नसाल, तर हे उपाय करा

जे लोक कर्जात बुडलेले आहेत त्यांना बरेच मानसिक तणावाला तोंड द्यावे लागते. कर्जाची परतफेड करण्याची चिंता नेहमीच त्यांच्या डोक्यात असते, त्याचबरोबर कर्ज फेडणार्‍याची आर्थिक स्थिती देखील कमकुवत होत जाते. सर्व प्रयत्न करूनही त्यांचे कर्ज संपत नाही.

ज्योतिषशास्त्राने असे काही उपाय सांगितलेले आहेत, जे पूर्ण आत्मविश्वासाने केल्यास लवकरच कर्जातून मुक्तता प्राप्त होते. आणि आर्थिक परिस्थिती सुधारते तर चला जाणून घेऊया कर्जमुक्तीचे उपाय….

1) विग्नहर्ता श्री गणपती बाप्पा प्रत्येक अडथळ्याला पराभूत करणारे आहेत. जेथे ते राहतात तेथे बुद्धी आणि लक्ष्मी दोघेही वास्तव्य करते. आर्थिक त्रास दूर करण्यासाठी हिरव्या रंगाचा गणपतीचे दोन मूर्ती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसवाव्यात. दोन्ही मूर्ती अशा प्रकारे ठेवा की एका मूर्तीचे तोंड हे आतल्या बाजूला असेल तर दुसऱ्या मूर्तीचे बाहेरील दिशेने असेल, मागील बाजूने कोणत्याही मूर्तीचे दर्शन होऊ नये. असे केल्यास आपली आर्थिक परिस्थिती वेळेतच सुधारण्यास सुरवात होते.

2) दर मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जावून नारळ दान करा आणि हनुमानाला पूर्ण श्रद्धेने प्रार्थना करा. यामुळे पैशाच्या संबंधित समस्या दूर होतात. दर मंगळवारी हनुमान मंदिरात जावे, चमेलीचा तेलामध्ये सिंदूर मिसळून हनुमाना ला अर्पण करा आणि बजरंग बाणचे पठण करा. यामुळे कर्जापासून मुक्त होण्याचा मार्ग मोकळा होतो.

3) जर तुम्हाला कर्ज परतफेड करायचे असेल तर मंगळवार हा दिवस योग्य आहे, ज्यामुळे लवकरच कर्ज संपुष्टात येऊ लागते. कोणत्याही कारणास्तव तुम्हाला कर्ज घ्यायचे असल्यास बुधवारी कर्ज घेण्याचा प्रयत्न करा. या दिवशी घेतलेले कर्ज परतफेड करणे सोपे असते आणि कोणत्याही कारणास्तव आपण मंगळवारी कर्ज घेऊ नये.

4) बुधवारी हा गणेशाचा दिवस मानला जातो, शुक्ल पक्षाच्या बुधवारपासून गणेश स्तोत्र पठण करा, व याचे दर बुधवारी नियमितपणे वाचन करा. हे केल्याने तुमच्यावर श्री गणपती प्रसन्न राहतील आणि तुमची कर्जाची समस्या दूर होतील.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate