करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म देताच तैमुर झाला ट्रोल!!!चाहते म्हणाले की……

करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म देताच तैमुर झाला ट्रोल!!!चाहते म्हणाले की……

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. पतौडी खानदानात अजून एका वारसदाराचं आगमन् झालं आहे. करिना दुसऱ्यांदा आई झाली आहे. तर, सैफ अली खान चौथ्यांदा बाबा झाला आहे. या बातमीने चाहते प्रचंड खुश आहेत. त्यातचं तैमूर मोठा भाऊ झाल्याने सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे.

सैफ अली खान करिना सोबत इस्पितळात आहे. त्यादरम्यान एक व्हिडीओ वायरल होत आहे ज्यात, तैमूर देखील दिसत आहे. तैमूर इस्पितळात त्याच्या भावाला व आईला पाहायला गेला असल्याचं बोललं जातंय. या व्हिडीओनंतर काही फोटोही सोशल मीडियावर वायरल होत आहेत, ज्यात तैमूर गाडीमध्ये बसलेला दिसत आहे.

करिना कपूरच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माची बातमी कुटुंबीयांनी सोशल मीडियावर दिली होती. सैफ अली खान आणि करिनाची बहीण रिद्धिमा कपूरने या गोष्टीचा खुलासा करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

जेव्हा पासून ही बातमी आली आहे तेव्हापासून सगळ्यांच्या नजरा खान आणि कपूर कुटुंबावर खिळल्या आहेत. दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. ही गोड बातमी ऐकून करीनाचे वडील रणधीर कपूर यांच्याही आनंदाला पारावार उरला नाही.

दुसरीकडे, चाहते तैमूरच्या लहान भावाच्या नावाबद्दल विचारात पडले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, ती तिच्या दुसऱ्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवणार आहे. असे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

त्यावरूनदेखील ट्विटरवर औरंगजेब ट्रेण्ड करत असून चाहते मीम्सच्या माध्यमातून या गोष्टीचा आनंद घेत आहेत. तसेच, तैमूरची लोकप्रियता आता कमी होणार या विचारांचे मीम्स सोशल मीडियावर वायरल होत आहेत.

Aniket Ghate