सीताच्या भूमिकेसाठी करिनाने मागितलेले मानधन ऐकून निर्मात्यांचे डोळेच पांढरे झाले!!तुम्ही पण घ्या जाणून!!

सीताच्या भूमिकेसाठी करिनाने मागितलेले मानधन ऐकून निर्मात्यांचे डोळेच पांढरे झाले!!तुम्ही पण घ्या जाणून!!

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर गेली दोन दशकं चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहे. करिनाने अनेक हिट चित्रपटात काम केलं. करिनाचा समावेश बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींच्या नावामध्ये केला जातो. करिना आमिर खानसोबत ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात झळकली.

त्यासोबतच चाहते करिनाच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे करिना लवकरच ‘सीता’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार असल्याची चर्चा आहे. परंतु, या चित्रपटासाठी करिनाने मागितलेलं मानधन ऐकून निर्मात्यांचे डोळे पांढरे झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामायणावर आधारित ‘सीता’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी निर्मात्यांनी करिनाला संपर्क केला होता. बॉलिवूड निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक अलौकिक देसाई काही महिन्यांपूर्वी चित्रपटाची कथा घेऊन करिनाकडे गेले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, करिनाने त्यांच्याकडे सीतेच्या भूमिकेसाठी बऱ्याच मोठ्या रक्कमेची मागणी केली आहे.

एरवी करिना एका चित्रपटासाठी ६ ते ८ कोटी रुपयांचं मानधन घेते. परंतु, या चित्रपटासाठी करिनाने तब्बल दुप्पट मानधनाची मागणी केली आहे. ‘सीता’ हा चित्रपट करिनाच्या करिअरसाठी महत्वाचा असल्याची जाणीव तिला असल्याने करिनाने चित्रपटासाठी १२ कोटींची मागणी केली आहे.

एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, करिना सध्या करिना हंसल मेहता यांचाही एक चित्रपटात काम करणार आहे. या दोन्ही चित्रपटांचं चित्रीकरण पुढील एका महिन्यात पूर्ण करून करिना ‘सीता’ चित्रपटासाठी पूर्ण वेळ देणार आहे. या चित्रपटासाठी करिनाला १० ते १२ महिने काम करावं लागेल.

शिवाय आपला संपूर्ण वेळ एकाच चित्रपटाला द्यावा लागणार आहे. परंतु, करिनाने मागितलेल्या मानधनामुळे निर्माते पुनर्विचार करत आहेत. चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंती करिना असली तरी ते तिच्याऐवजी नव्या अभिनेत्रीला संधी देऊ शकतात अशी चर्चा सिनेवर्तुळात आहे.

Editor