करिना कपूरला दुसऱ्यांदाही झाला मुलगाच युजर्स म्हणाले,की……

करिना कपूरला  दुसऱ्यांदाही झाला मुलगाच युजर्स म्हणाले,की……

करिना कपूर आणि सैफ अली खान पुन्हा एकदा आई- बाबा होणार आहेत. लवकरच करिना आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. दरम्यान, सैफची बहीण सबा अली खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

तिच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सबाने सैफचा एक जुना फोटो शेअर केला आहे. यात त्याच्यासोबत लहान इब्राहिमही दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना सबाने लिहिलं की, ‘हा एक छोटासा इशारा आहे, माझे चॅम्प.’

हा फोटो पाहून युझर्सने तिला सोशल मीडियावर प्रश्न विचारायला सुरुवात केली. पुन्हा मुलगाच झाला का हा प्रश्न अनेकांनी विचारला. तर अनेकांनी तो छोटा मुलगा दुसरा कोणी नसून इब्राहिम असल्याचं म्हटलं आहे..

दरम्यान, करिना आई झाल्याची कोणतीही अधिकृत बातमी अजून समोर आलेली नाही. तिच्या डिलिव्हरीनंतरच करिनाला मुलगा झाला की मुलगी ते कळेल.सैफची बहीण सबा व्यवसायाने एक ज्वेलरी डिझायनर आहे. ती सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.

आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती भाऊ सैफ आणि त्याची मोठी मुलं इब्राहिम अली खान आणि सारा अली खानसोबत दिसली. एवढंच नाही तर सबाने करीना आणि सैफचं व्हॅलेन्टाइन डेलाही अभिनंदन केलं होतं.

नुकताच तिने कुटुंबाचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत सबासोबत सोहा अली खान आणि सैफची मुलगी सारा अली खान दिसत आहेत. हा फोटो २०१६ मध्ये दिवाळी सेलिब्रेशनच्या निमित्ताने क्लिक केला होता.

सैफ- करिनाचा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, ‘जेव्हा दोन माणसं एकमेकांसाठी बनले असतात तेव्हा संपूर्ण सृष्टी त्यांना एकत्र आणण्यासाठी मदत करते. प्रेम कधीच बदलत नाही हे काळानुसार फक्त अधिक घट्ट होत जातं. माशाल्लाह.’

Aniket Ghate