आणि करीना कपूरचा पत्ता झाला कट; आता सीतेच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्रीच्या नावाची चर्चा!!

आणि करीना कपूरचा पत्ता झाला कट; आता सीतेच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्रीच्या नावाची चर्चा!!

बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान गेल्या काही दिवसांपासून एका खास गोष्टीमुळे चर्चेत आहे. करीना सीतेची भूमिका साकारणार यामुळे ती चर्चेत आली होती. अनेकांनी करीना सीतेच्या भूमिकेसाठी योग्य नसल्याचं म्हणत वि रो ध केला होता. काही वृत्तांनुसार करीना कपूरने सीतेच्या भूमिकेसाठी १२ कोटी रुपयांच्या मानधनाची मागणी केली होती.

त्यानंतर करीनाला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला.यानंतर आता एक नवी माहिती समोर आली आहे. करीना ऐवजी बॉलिवूडची क्वीन कंगना कणौतचा सीतेच्या भूमिकेसाठी विचार केला जात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्नुसार ‘सीता- द इनकार्नेशन’ चे मेकर्स आता करीना ऐवजी कंगना रणौतला कास्ट करण्याचा विचार करत आहेत.

सिनेमाचे लेखक केवी विजयेंद्र यांनी कंगना रणौतला सिनेमातात घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे बॉलिवूडची मणीकर्णिका आता ‘सीता- द इनकार्नेशन’ मध्ये झळकणार अशा चर्चांना उधाण आलंय. असं असलं तरी सिनेमाचे मेकर्स आणि कंगना रणौतकडून अदयाप या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही.

तर काही इतर वृत्तांनुसार करीनाला सीतेच्या भूमिकेसाठी विचारणाच करण्यात आलीच नव्हती. लेखक केवी विजयेंद्र यांनी कंगनालाच पहिली पसंती दिली असून कंगना या भूमिकेसाठी योग्य निवड असल्याचं त्याचं मत आहे.

दरम्यान या भूमिकेसाठी अभिनेत्री आलिया भट्टचं नाव देखील समोर आलं होतं. असं असलं तरी अद्याप मेकर्सकडून सीतेच्या भूमिकेसाठी कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही.

.

Team Hou De Viral