कडकनाथ कोंबडीमध्ये असे काय विशेष असते आणि साधारण कोंबडी व कडकनाथ यांच्यामध्ये काय फरक आहे ?

कडकनाथ कोंबडीमध्ये असे काय विशेष असते आणि साधारण कोंबडी व कडकनाथ यांच्यामध्ये काय फरक आहे ?

कडकनाथ हा कोंबडी मधला एक प्रकार किंवा जात आहे. आणि ती मध्यप्रदेशातील झाबुआ भागात मिळते तिथे या कोंबडीला “काली मासी” असे म्हंटले जाते. कडकनाथ कोंबडीचा रंग पूर्णपणे काळा असतो त्यामुळे ती दिसायला फार सुंदर असते. आणि या कोंबडीचे रक्त आणि मांस पण काळे असते. त्यामुळे या कोंबडीचे आकर्षण लोकांमध्ये वाढत चालली आहे.

साधारण कोंबडी आणि कडकनाथ कोंबडीत काय फरक आहे –

सर्वसाधारणपणे सर्व कोंबड्यांचे डोक्यावरील तुरे हे लालच असतात शिवाय पिसांचा रंगही निरनिराळा असतो पण कडकनाथ कोंबड्यांमध्ये मात्र तुरे हे काळेच असतात आणि रंग हा काळाचा असतो (अपवाद वगळता ).

हा या दोन प्रकारातील मुख्य फरक होय परंतु साधारण कोंबड्यांच्या तुलनेत कडकनाथ कोंबड्या मात्र आरोग्यपूरक असतात. त्यांचे मांसही रुचकर असते. किंमतीला तर त्या प्रचंड महाग असतातच शिवाय त्यांच्या संगोपनासाठी बराचश्या कालावधीची आवश्यकता लागतो. त्यांची अंडीही पौष्टिक असतात.

कडकनाथ खरंच आरोग्यासाठी लाभदायक आहे का ?

कडकनाथ कोंबडीत औषधी गुण आहेत असा प्रचार प्रसार केला जातो पण त्यात औषधी गुण का आहेत यावर विचार करणे गरजेचे आहे. जंगलाच्या ठिकाणी हि कोंबडी मिळत असल्याने तेथे ती विविध प्रकारचे औषधी वनस्पती, झाडावरील फुल खाते आणि तेथील माती अजूनही रसायनमुक्त असल्याने त्या मातीतील वेगवेगळे कीटक हि कोंबडी खाते आणि हे सगळं खाल्ल्यामुळे तिच्यात औषधी गुण आहेत.

परंतु काही लोक त्या कोंबडीला आणून तिला बंदिस्त जागेत ठेवत आहेत आणि त्यांना खायला फॅक्टरी मधील अन्न देत आहेत आणि औषधी गुणांच्या नावाखाली विकून लोकांची फसवणूक करत आहेत. माघील अनेक वर्षांपासून सगळीकडे या कोंबडीची जोऱ्यात जाहिरात सुरु आहे, मध्यप्रदेशातच नव्हे तर भारतात सगळीकडे या कोंबडीची सध्या धूम सुरु आहे.

झाबुआ हा तसा आदिवासी भाग आहे. आणि या कोंबडीचे संवर्धन करण्यात आदिवासींचं खूप मोठा हात आहे. मध्यंतरी झाबुआ (मध्यप्रदेश) आणि दंतेवाडा (छत्तीसगढ) या दोन राज्यात या कोंबडीच्या भौगोलिक सूचकांक मानांकनासाठी (GI) भांडण झाले होते. आणि त्यात मध्यप्रदेश राज्याचा विजय झाला.

माघे महाराष्ट्रात गाजलेल्या “कडकनाथ कोंबडी घोटाळ्यामुळे” परत या कोंबडीचा प्रसार होत आहे आणि यात शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य लोकांची कशी फसवणूक होते हे पण बाहेर आले आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate