झाडांच्या खोडाला पांढरा किव्हा लाल रंग का लावतात ? काय आहे त्यामागचे कारण, जाणून घ्या

झाडांच्या खोडाला पांढरा किव्हा लाल रंग का लावतात ? काय आहे त्यामागचे कारण, जाणून घ्या

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर आपण बर्‍याचदा बघितले असे की झाडाच्या खोडांवर पांढरा आणि लाल रंग लावलेला असतो. आणि आज त्याबद्दल आजच्या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.

तुम्ही बऱ्याचदा विचार देखील केला असेल की पांढरा आणि लाल रंगच का ? झाडांच्या खोडावर रंग लावण्याची ही पद्धत खूप जुनी आहे. परंतु आपण कधी याबाबत विचार केला आहे का? वास्तविक, यामागे बरीच शास्त्रीय कारणे आहेत, ज्याबद्दल आपल्याला कदाचित माहिती नसेल. तर चला मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आम्ही आपल्याला याबद्दल माहिती जाणून घेऊया…

झाडांच्या खोडांवर रंग लावण्याचीही पद्धत खूप जुनी आहे. वास्तविक, हिरव्यागार वृक्षांना अधिक मजबूत करणे हे यामागील हेतू आहे. तुम्ही पाहिलं असेल की झाडांमध्ये बऱ्याचदा फट, चीर ह्या पडतात. आणि यामुळे साल बाहेर पडायला लागते, त्यामुळे झाडे कमकुवत होऊ लागतात. म्हणून, त्यांना मजबूत करण्यासाठी त्या रंग हा दिला जातो. रंग दिल्यामुळे झाडांचे आयुष्य देखील वाढते.

तसेच झाडांचे खोड रंगवण्यामागील हेतू म्हणजे झाडांना किडे-कीटक होत नाहीत. कारण हे कीटक कोणत्याही झाडाला आतून पोकळ करतात, परंतु रंगामुळे झाडांवर किडे राहत नाहीत. झाडे रंगविल्यामुळे झाडांची कीटकांपासून सुरक्षा होते.

झाडांना रंग दिल्यामुळे त्यांची सुरक्षाही सुधारते. रंग देणे हे दर्शविते की ही झाड वनविभागाच्या नजरेखाली आहेत आणि त्या झाडांना कोणालाही कापता येणार नाहीत. काही ठिकाणी फक्त पांढर्‍या रंगाचा उपयोग झाडांना रंगविण्यासाठी केला जातो, तर बर्‍याच ठिकाणी लाल आणि निळा रंग देखील वापरला जातो.

राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यालगतची झाडेदेखील पांढर्‍या रंगानी रंगवलेली असतात, जेणेकरून रात्रीच्या अंधारात ही झाडे त्यांच्या रंगांमुळे गाडीच्या प्रकाशाने सहज उठून दिसू शकतील.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate