…म्हणून दर 3 वर्षाने इंडोनेशियामध्ये ‘थडग्या’ मधून ‘मृतदेहा’ ला बाहेर काढले जाते, जाणून ते लोक असे का करतात

…म्हणून दर 3 वर्षाने इंडोनेशियामध्ये ‘थडग्या’ मधून ‘मृतदेहा’ ला बाहेर काढले जाते, जाणून ते लोक असे का करतात

जगातील विविध भागातील लोक अनेक प्रकारच्या प्रथा या पाळतात आणि चित्र विचित्र पद्धतीने आपले उत्सव सण साजरे करतात, पण आज आम्ही तुम्हा अश्या एका उत्सवाविषयी सांगणार आहोत, जो उत्सव प्रेतांसोबत साजरा केला जातो. आपल्याला या उत्सवाबद्दल जाणून थोडे विचित्र वाटले असेल, परंतु हे एकदम खरे आहे. इंडोनेशियातील एक विशेष जमात हा मा’नेने नावाने ओळखला जाणारा उत्सव साजरा करते.

मा’नेन महोत्सव सुमारे 100 वर्षांपूर्वी सुरू झाला होता. हा उत्सव साजरा करण्यामागील बरप्पू गावतली लोक खूप रोमांचक कथा सांगतात. लोकांच्या मते, शंभर वर्षांपूर्वी ‘टोराजन’ टोळीचा एक शिकारी जंगलात शिकार करण्यासाठी गेला होता. आणि त्याचे ‘पोंग रुमासेक’ असे होते. त्या रुमासेक नावाच्या शिकाऱ्याला समुद्रकाठच्या जंगलात एक मृ-तदेह दिसला.

रुमासेकने कुजलेला मृ-तदेह पाहिला. त्याने स्वतःचे कपडे त्या देहाला घातले आणि मृ-तदेहावर अंत्यसंस्कार केले. या घटनेनंतरच रुमासेकचे आयुष्य बदलले आणि त्याची दुर्दशा देखील संपुष्टात आली. तेव्हापासून ‘टोराजन’ जमातीतील लोकांमध्ये पूर्वजांचे प्रेत सजवण्याची प्रथा सुरू झाली. त्यांचा असा विश्वास आहे की प्रेताची काळजी घेतल्याने पूर्वजांचा आत्मा त्यांना आशीर्वाद देतात.

एखाद्याचा मृ-त्यू झाल्यानंतरच हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात होते. कुटुंबातील व्यक्तीच्या मृ-त्यूनंतर, त्या देहाला एका दिवसात दफन केले जात नाही. तर बरेच दिवस उत्सव साजरा केला जातो. या सर्व गोष्टी मृ-त व्यक्तीच्या आनंदासाठी केल्या जातात आणि पुढच्या प्रवासासाठी त्याला तयार केले जाते.

या प्रवासाला ‘पुया’ म्हणतात. या उत्सवाच्या वेळी नातेवाईक बैल, म्हैस यासारख्या प्राण्यांचा ब-ळी देतात आणि मृ-तांचे घर त्यांच्या शिंगांनी सजवतात. त्यांचा असा विश्वास आहे की ज्या व्यक्तीच्या घरी जेवढी शिंगे लावलेली आहेत त्यांना पुढील प्रवासात तेवढाच आदर सन्मान मिळतो.

नंतर, मृ-तांना जमिनीत पुरण्याऐवजी लोक लाकडी ताबूत मध्ये बंद करुन त्यांना गुफामध्ये ठेवतात. जर 10 वर्षापेक्षा कमी वयाच मुलं किव्हा अर्भक म-रण पावले असेल तर त्याला झाडाच्या दरारामध्ये ठेवले जाते. मृ-त व्यक्तीचे शरीर बरेच दिवस सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांमध्ये ते गुंढळले जाते.

मृ-तकाला केवळ कपडेच नाही तर फॅशनेबल गोष्टी देखील घातल्या जातात. अशी सजावट केल्यानंतर लोक मृ-तांना लाकडी ताबूत लॉक करतात आणि डोंगराळ गुहेत ठेवतात. त्याच्या सोबत त्याच्या संरक्षणासाठी लाकडी पुतळा हा ठेवला जातो, ज्यास ताऊ-ताऊ म्हणतात. असा विश्वास आहे की ताबूच्या आत ठेवलेले शरीर मृ-त नाहीये, परंतु आजारी आहे आणि जोपर्यंत तो झोपलेला आहे तोपर्यंत त्याला संरक्षणाची आवश्यकता असेल.

दर 3 वर्षांनी पुन्हा प्रे-तांना बाहेर काढले जाते आणि प्रे-तांना पुन्हा नवीन कपडे परिधान केले जातात. इतकेच नाही तर लोक प्रेतांसोबत बसून जेवण देखील करतात. नातेवाईकही मृ-तदेहाला घातलेलं कपडे परिधान करतात. कित्येक वर्षांनंतर, जेव्हा प्रेताचे रुपांतर हे हाडात व्हायला लागते, तेव्हा त्याला जमिनीत दफन केले जाते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate